जिल्हाशिक्षणसामाजिक

जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी प्रात्यक्षिक ज्ञान आवश्यक – डॉ. प्रफुल्ल आडकर…

NuLife Pharmaceuticals, पुणे येथे JSPM विद्यार्थ्यांचा औद्योगिक अभ्यास दौरा यशस्वी...

हडपसर (पुणे) : जागतिक स्तरावरील स्पर्धेमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी केवळ सैद्धांतिक ज्ञानावर न थांबता प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) नॉलेजवर भर देणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रफुल्ल आडकर यांनी केले.

Jayawant Shikshan Prasarak Mandal (JSPM) संचलित Jayawantrao Sawant Diploma Pharmacy Institute – इंडस्ट्री इंटरॅक्शन (III) सेलतर्फे प्रथम वर्ष डिप्लोमा फार्मसी विद्यार्थ्यांचा औद्योगिक अभ्यास दौरा दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी NuLife Pharmaceuticals Pvt. Ltd., पुणे येथे आयोजित करण्यात आला. या अभ्यास दौर्‍यात प्रथम वर्षातील एकूण ६२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

या भेटीदरम्यान कंपनीतील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी औषधनिर्मितीतील आधुनिक तंत्रज्ञान प्रक्रिया, उत्पादन व्यवस्थापन प्रणाली तसेच औषधांच्या गुणवत्ता नियंत्रण (Quality Control) आणि गुणवत्ता हमी (Quality Assurance) संदर्भातील सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून औषध उद्योगातील अद्ययावत घडामोडी जाणून घेतल्या. विशेषतः गुणवत्ता तपासणी प्रक्रिया, नियामक मार्गदर्शक तत्त्वे आणि उत्पादनातील सुरक्षितता मानके याविषयी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाधारित ज्ञान मिळाले.

सदर अभ्यास दौरा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जेएसपीएम हडपसर शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ. वसंत बुगडे आणि डॉ. मारुती काळबांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आयोजन प्रा. चेतन मामडगे यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रा. अनुराधा पाटील, प्रा. स्वप्नील गाडेकर, प्रा. निकिता कोलते, प्रा. प्रगती लगदिवे, प्रा. रविराज जाधव, प्रा. तनुजा काशीद तसेच स्वप्नाली सावंत, प्रियांका महाजन, विवेक थोरात, स्वाती माकोने, रुपाली शिंदे, प्रतीक्षा थोरात, ऋतुजा दाते, पांडुरंग पवार, आकांक्षा जाधव आणि कमल बनसोडे यांनी सहकार्य केले.

या औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना औषधनिर्मिती क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यपद्धती समजून घेण्याची संधी मिळाली असून, त्यांच्या व्यावसायिक कौशल्यवृद्धीस मोठी चालना मिळाल्याचे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.

Edited sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??