क्राईम न्युजजिल्हा

४ महिन्यापासून फरार असलेल्या स्थानबध्द इसमास तपास पथकाने घेतले ताब्यात ” ; हडपसर…व्हिडिओ पहा…

पुणे (हडपसर) : आकाश इरेशा नाईक ऊर्फ शिंदे वय २३ वर्ष रा. इंदिरानगर ०१ नंबर गल्ली, सुरक्षानगर हडपसर पुणे याचे विरुध्द खुनाचा प्रयत्न, गंभिर दुखापत, हत्यार बाळगणे असे ५ गुन्हे दाखल आहेत. दाखल गुन्ह्यांमधून तो जामीनावर सुटले नंतर पुन्हा आपली गुन्हेगारी कृत्ये करीत असल्याने त्याचे विरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत कायदा सन (१९८१ सालचा महाराष्ट्र अधिनियम क्र. ५५) (सुधारणा १९९६) (सुधारणा २००९) सुधारणा २०१५ चे कलम ३ प्रमाणे ०१ वर्षे स्थानबध्द करणेबाबत प्रस्ताव पाठविला असता पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे कडील आदेशान्वये ०१ वर्षे स्थानबध्द करणेबाबत दिनांक २०.१२.२०२४ रोजी आदेशीत पारीत केला होता.

डॉ. राजकुमार शिंदे पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-०५ पुणे, यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व मा. संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आणि निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या सुचनांप्रमाणे तपासपथक प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, व तपास पथक अंमलदार हे काम करीत असताना, स्थानबध्द इसम हा वेळोवेळी त्याचे राहण्याचे ठिकाण बदलीत होता. तो कर्नाटक राज्य तसेच पुण्यात वेळोवेळी ठिकाणे बदलून राहत असल्याने मिळून येत नव्हता.

तपासपथकास मिळालेल्या गोपनीय माहीती चे आधारे स्थानबध्द इसम आकाश इरेशा नाईक ऊर्फ शिंदे वय २३ वर्ष रा. इंदिरानगर ०१ नंबर गल्ली, सुरक्षानगर हडपसर पुणे यास ताब्यात घेतले आहे. आदेशाप्रमाणे त्याची कोल्हापूर कारागृह येथे रवानगी करीत आहोत.

सदरची कामगिरी ही अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त साो, पुर्व प्रादेशिक विभाग, डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अनुराधा उदमले मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, निलेश जगदाळे, पोनि. (गुन्हे), यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव तुकाराम झुंजार, चंद्रकांत रेजितवाड, अमोल दणके, महेश चव्हाण, अमित साखरे, महाविर लोंढे, निलेश किरवे, बापु लोणकर, अजित मदने, कुंडलीक केसकर, अभिजीत राऊत, निगराणी पथकातील सहा. पोलीस फौजदार प्रविण शिंदे, पोलीस अंमलदार शरद चव्हाण, प्रशांत दुधाळ, मनिषा जरांडे, यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??