क्राईम न्युज

अवैध धंदे ‘बंद’च्या दाव्यांमागचे वास्तव उघड ; लोणी काळभोरमध्ये अवैध हातभट्टीवर धडक कारवाई, २.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त…

लोणी काळभोर (ता. हवेली) : लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे पूर्णपणे बंद असल्याचे सांगितले जात असतानाच प्रत्यक्षात ते सुरूच असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. पोलिसांनी अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर केलेल्या धडक कारवाईत २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत या दाव्यांमागचे वास्तव उघड केले आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालय यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी तपास पथकाला मार्गदर्शन करत प्रभावी कारवाईचे आदेश दिले.

दि. ४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ९.१५ वाजता गस्तीदरम्यान पोलिसांना लोणी काळभोर येथील आलमगीर जामा मशिद कब्रस्तान परिसरात संशयास्पद हालचाल आढळून आली. एका पत्र्याच्या शेडमध्ये मुबारक जाफर गड्डे (वय ४८) व बानो मुबारक गड्डे (वय ४०) हे ५०० लिटरच्या टाकीत साठवलेली सुमारे ४५० लिटर गावठी हातभट्टी दारू प्लास्टिक कॅनमध्ये भरून विक्रीसाठी तयार करत असल्याचे आढळले.

तत्काळ छापा टाकून पोलिसांनी ४५,००० रुपयांची दारू, तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी Maruti Suzuki Alto कार (१.५० लाख), TVS Jupiter (५० हजार) आणि Honda Activa (५० हजार) असा एकूण २.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

तपासात आरोपींनी ही दारू समीर संजय राठोड (वय २३, रा. शिंदवणे) याच्याकडून घेतल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी शिंदवणे येथे जाऊन त्यालाही ताब्यात घेतले. या प्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तसेच पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलीस हवालदार माने, सागर जगदाळे, पोलीस अंमलदार दडस, अशोक गिरी, सोनवणे व महिला पोलीस अंमलदार पोळ यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या केली.

‘बंद’च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह ?

स्थानिक पातळीवर अवैध धंदे बंद झाल्याचे वारंवार सांगितले जात असले, तरी अशा प्रकारच्या कारवायांमधून वास्तव वेगळेच असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांची कारवाई कौतुकास्पद असली तरी, हे धंदे अजूनही सुरूच असल्याने प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांमध्येही याबाबत नाराजी व्यक्त होत असून, केवळ छापेमारीपुरते न राहता अवैध धंद्यांचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी सातत्यपूर्ण आणि कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

पोलिसांनी मात्र अशा कारवाया पुढेही सुरू ठेवण्याचा इशारा दिला असून, अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??