शिक्षणसामाजिक

‘रंग रूपक’ ठरले नाट्य रसिकांसाठी पर्वणी!, एमआयटी-एडीटी विद्यापीठातील तीन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप

पुणे :

सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, एमआयटी-एडीटी विद्यापीठ, पुणे येथील नाट्य विभाग आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर , संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राज कपूर नाट्यगृह, पुणे येथे झालेल्या ‘रंग रूपक’ या तीन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादात भारतीय नाट्य शास्त्रावर अतिशय मौलिक मंथन पार पडले. ‘रंग रूपक’ हा परिसंवाद नाट्य रसिकांसाठी पर्वणीच ठरला.

भारतीय ज्ञान परंपरेतील नाट्य संस्कृतीचा प्रसार व्हावा या हेतूने “भारतीय ज्ञान परंपरेतील नाट्यशास्त्राची भूमिका” ही विषयवस्तू घेवून आयोजित या परिसवांदात राष्ट्रीय स्तरावरील नामांकित नाट्यदिग्दर्शक/नाट्यकर्मी यांनी तीन दिवस विद्यार्थी व सहभागींना मार्गदर्शन केले. या परिसंवादाचे उद्घाटन, राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्लीचे माजी संचालक पद्मश्री प्रा. वामन केंद्रे, राष्ट्रीय नाट्य विद्यालय,नवी दिल्लीचे कार्यकारी अध्यक्ष पद्मश्री प्रा. भरत गुप्त, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, संस्कार भारतीचे अभिजित गोखले, सिनेनाट्य विभागाचे अधिष्ठाता डॉ. मुकेश शर्मा, आयोजक डॉ. अमोल देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

उद्घाटन सोहळ्याची सुरुवात जर्जर ध्वज पूजन आणि संबळ वादनाने झाली. यानंतर रंगमंचावर नटराज पूजन होऊन अंगवस्त्र व संत ज्ञानेश्वर प्रतिमा देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकतेतून नाट्यशास्त्रातील भारतीयत्व आणि स्वत्व चा विचार या परिसंवादाची प्रेरणा असल्याचे वक्तव्य परिसंवाद संयोजक व नाट्य विभाग प्रमुख डाॅ.अमोल देशमुख यांनी केले.

यानंतर आपल्या उद्घाटनपर भाषणातून भरतमुनी रचित नाट्यशास्त्र हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वपूर्ण वारसा असून आजही नाट्यशास्त्र प्रासंगिक असल्याचे प्रा. वामन केंद्रे म्हणाले. यापुढे बोलतांना भारतीय ज्ञान परंपरेत नाट्यशास्त्राची भूमिका महत्वपूर्ण याकरिता आहे की, भारतीय संस्कृती, परंपरा, तत्वज्ञान, मानसशास्त्र याचा विचारही यात झालेला दिसून येतो. या शास्त्राला वगळून अभिनय प्रशिक्षणाचा विचार करता येत नसल्याने राष्ट्रीय नाट्य विद्यालय नवी दिल्ली येथील नाट्य प्रशिक्षणात नाट्यशास्त्र एक महत्वाचा भाग आहे,असे वक्तव्य त्यांनी केले.

पद्मश्री प्रा. भरत गुप्त यांनी आपल्या बीज भाषणातून नाट्यशास्त्राचा इतिहास आणि सध्याच्या काळात त्याचे महत्व अधोरेखित करताना नाट्यशास्त्राचे विशेष प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय नाट्य विद्यालय ने वाराणशी केंद्र सुरू केल्याचे सांगितले. या परिसंवादाच्या आयोजनासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या नाट्य विभागाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून असा नाट्य विभाग स्थापन केल्या बद्दल विद्यापीठाचे तोंड भरून कौतुक केले. यानंतर कुलगुरू डॉ. राजेश एस, कुलसचिव डॉ.चोपडे,अधिष्ठाता डॉ.मुकेश शर्मा आणि अभिजित गोखले यांनी परिसंवादाला शुभेच्छा दिल्यात.

याप्रसंगी कार्यक्रमाचे संचालन अभिनेत्री कल्याणी कुमारी यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत कुलकर्णी यांनी केले.

उद्घाटनानंतर, पद्मश्री वामन केंद्रे दिग्दर्शित ‘मध्यम व्यायोग’ चे हिंदी रूपांतर “मोहे पिया”या अंगावर शहारे आणणाऱ्या रोमांचक नाटकाचे सादरीकरण, उर्मिलाताई कराड सभागृहात करण्यात आले. ज्याला, ज्याला उपस्थितांची मोठी दाद मिळाली.

पहिल्या दिवसाप्रमाणेच परिसंवादाचा दुसरा दिवसही कला क्षेत्रातील विद्यार्थी, अभ्यासकांसाठी पर्वणी ठरला. ज्यात, ‘नाट्यशास्त्र अभिनय पक्ष’ या विषयावर प्रख्यात शास्त्रीय नर्तक पद्मश्री शशधर आचार्य, प्रो.सुज्ञान कुमार मोहंती, डॉ. गौतम चॅटर्जी यांनी मार्गदर्शन केले. ज्यात त्यांनी नाट्यशास्त्रातील अभिनयाचे विविध पैलू उपस्थितांसमोर उलगडले. दुपारच्या सत्रात, गुरु शमा भाटे, डाॅ.प्रसाद भिडे व प्रा.संध्या रायते यांनी ‘नाट्य शास्त्र- प्रयोग पक्ष’ या विषयावर उपस्थितांना बहुमोल मार्गदर्शन केले. त्यानंतर, गुरु शमा भाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘राम-लल्ला’ या भरतनाट्यमच्या नृत्य-नाटिकेचा प्रयोग करण्यात आला. ज्याने उपस्थितांना संमोहित केले.

या परिसंवादाच्या आयोजनासाठी एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू डॉ. राजेश एस, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालिका आस्था गोडबोले कार्लेकर, संस्कार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्रीअभिजीत गोखले यांचे मार्गदर्शन मिळाले. परिसंवादाला निरीक्षक म्हणून डॉ. जयंत शेवतेकर, डॉ संयुक्ता थोरात, डॉ. अनुराधा पत्की, डॉ. योगिता महाजन, डॉ. संपदा कुलकर्णी, प्रा. रेणुका बोधनकर, अनंत पणशीकर, प्रवीण कुलकर्णी, कविता विभावरी, विशाल तराळ उदय शेवडे यांच्यासह संपूर्ण भारतातून अनेक विश्वविद्यालयाचे नाट्यविभागाचे विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक,कलावंत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. परिसंवादाच्या यशस्वितेसाठी नाट्य विभाग प्रमुख डॉ. अमोल देशमुख, समन्वयक म्हणून प्रा. सुनीता नागपाल, प्रा. निखिल शेटे, प्रा. अनिर्बाण बनिक आणि प्रा. किरण पावसकर यांनी अथक परिश्रम घेतले.

‘नाट्य उत्पत्ती’ व ‘देवशुनी’ नाटकांचे सादरीकरण…

या परिसंवादाच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात ज्येष्ठ नाट्य तज्ज्ञ डॉ. संगीता गुंदेचा आणि पियाल भट्टाचार्य यांनी नाट्यशास्त्राच्या ‘सौदर्य’ पक्षावर मार्गदर्शन केले. यानंतर समारोपीय सत्राला संगीत नाटक अकादमी, नवी दिल्लीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा, पद्मश्री भरत गुप्त, अभिजित गोखले यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी निरीक्षकांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. जयंत शेवतेकर, डॉ. संयुक्ता थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर दुपारी उर्मिलाताई कराड सभागृहात डाॅ.संगीता गुंदेचा दिग्दर्शित ‘नाट्य उत्पत्ती’ आणि डाॅ.प्रसाद भिडे दिग्दर्शित ‘देवशुनी’ या नाटकांचे प्रयोग पार पडले. ज्याला उपस्थितांची भरघोस दाद मिळाली.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

वेध जनशक्तीचा शक्ती जनतेची, वेध सत्याचा! सूचना, अस्वीकरण व संपादकीय धोरण “वेध जनशक्तीचा” हे पुणे येथून कार्यरत असलेले स्वतंत्र वेब न्यूज पोर्टल असून, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय, गुन्हेगारी तसेच विविध जनहिताच्या विषयांवरील बातम्या आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, वृत्त, निवेदने, छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अन्य सामग्री ही उपलब्ध कागदपत्रे, अधिकृत माहिती, प्रत्यक्षदर्शी, संबंधित व्यक्ती, प्रतिनिधी, वार्ताहर तसेच विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार प्रकाशित केली जाऊ शकते. बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार जनहिताच्या दृष्टीने आवश्यक, महत्त्वाची किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याचा संपादकीय निर्णयाचा अधिकार “वेध जनशक्तीचा” राखून ठेवते. कोणत्याही व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणा, व्यावसायिक संस्था अथवा इतर घटकाविषयी बातमी प्रसिद्ध झाल्याने त्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध पूर्वग्रह किंवा वैयक्तिक वैर असल्याचे समजले जाऊ नये. बातमीमध्ये एखाद्या व्यक्तीवर आरोप, तक्रार, गुन्हा, चौकशी, कारवाई किंवा अन्य गंभीर बाब नमूद असल्यास, उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे ती बाब वाचकांसमोर मांडण्याचा पत्रकारितेचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आरोप प्रसिद्ध होणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरल्याचे मानले जाणार नाही. अंतिम सत्यता ठरविण्याचा अधिकार संबंधित सक्षम न्यायालय अथवा कायदेशीर प्राधिकरणास आहे. खोटी माहिती, दबाव व धमक्यांना थारा नाही “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाच्या दबावाखाली येऊन जनहिताच्या बातम्या मागे घेणे, बदलणे किंवा प्रसिद्ध न करणे यास बांधील राहणार नाही. तसेच, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर धमकी, दबाव, राजकीय हस्तक्षेप, वैयक्तिक आरोप, सोशल मीडिया दबाव किंवा अन्य कोणत्याही अनुचित मार्गाने संपादकीय निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न स्वीकारला जाणार नाही. मात्र, बातमीमध्ये वस्तुनिष्ठ तथ्यात्मक चूक असल्याचे विश्वसनीय पुराव्यांसह निदर्शनास आणून दिल्यास त्याची निष्पक्षपणे पडताळणी केली जाईल. दुरुस्ती, खुलासा व हरकत एखाद्या बातमीतील माहिती चुकीची, अपूर्ण किंवा वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचा दावा असल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्थेने केवळ तोंडी आक्षेप नोंदविण्याऐवजी— 👉संबंधित बातमीची लिंक, 👉चुकीची माहिती नेमकी कोणती आहे याचा स्पष्ट उल्लेख, 👉अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय पुरावे, 👉स्वतःची अधिकृत बाजू/खुलासा, 👉आवश्यक असल्यास संपर्काची माहिती आमच्याकडे उपलब्ध करून द्यावी. प्राप्त कागदपत्रे व माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आल्यास संबंधित बातमीमध्ये आवश्यक दुरुस्ती, स्पष्टीकरण, अद्ययावत माहिती किंवा अन्य योग्य संपादकीय कार्यवाही करण्यात येईल. केवळ बातमी आवडली नाही, प्रतिष्ठेला धक्का बसला, टीका झाली किंवा बातमी हटविण्याची मागणी करण्यात आली म्हणून बातमी आपोआप हटविली जाणार नाही. वार्ताहर व प्रतिनिधींबाबत महत्त्वाची सूचना “वेध जनशक्तीचा”शी संबंधित सर्व वार्ताहर, प्रतिनिधी व अन्य व्यक्तींनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेतच काम करावे. कोणत्याही व्यक्तीकडून पैशांची मागणी, खंडणीसदृश व्यवहार, वैयक्तिक लाभाची मागणी, धमकी, दबाव, ब्लॅकमेलिंग किंवा पोर्टलच्या नावाचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची वैयक्तिक राहील. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. स्रोत व गोपनीयता पत्रकारितेच्या कामकाजात प्राप्त होणाऱ्या काही माहितीचे स्रोत गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असू शकते. अशा वेळी कायदा व पत्रकारितेच्या मान्य तत्त्वांच्या अधीन राहून स्रोताची माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार संपादकीय विभाग राखून ठेवतो. तृतीय-पक्षाची सामग्री वाचकांच्या प्रतिक्रिया, निवेदने, जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, छायाचित्रे किंवा अन्य तृतीय-पक्षाची सामग्री प्रसिद्ध झाल्यास त्यातील प्रत्येक विधान हे पोर्टलचे अधिकृत मत असेलच असे नाही. अशा सामग्रीची जबाबदारी संबंधित सामग्री पुरविणाऱ्या व्यक्ती/संस्थेची राहू शकते. ⚠️ अंतिम महत्त्वाची नोंद “वेध जनशक्तीचा” हे सत्य, तथ्याधारित, जबाबदार आणि जनहिताची पत्रकारिता करण्यास कटिबद्ध आहे. अनावधानाने किंवा उपलब्ध माहितीच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या सामग्रीमध्ये तथ्यात्मक त्रुटी आढळल्यास योग्य पुराव्यांच्या आधारे त्याची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. मात्र, बातमीतील तथ्यात्मक चूक आणि बातमीमुळे निर्माण झालेली नाराजी या दोन वेगळ्या बाबी आहेत. तथ्यात्मक चूक सिद्ध झाल्यास दुरुस्ती केली जाईल; परंतु केवळ बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे निर्माण झालेला दबाव, नाराजी किंवा विरोध हा बातमी मागे घेण्याचा स्वयंचलित आधार मानला जाणार नाही. “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्तीची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करत नाही; त्याचप्रमाणे जनहिताशी संबंधित सत्य, अधिकृत आणि पडताळणीयोग्य माहिती केवळ कोणाला अप्रिय वाटते म्हणून दडपण्याचेही धोरण नाही. सर्व कायदेशीर बाबींमध्ये लागू असलेले भारतीय कायदे व सक्षम न्यायालय/प्राधिकरणाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील. न्यायक्षेत्र (Jurisdiction) या पोर्टलशी संबंधित कोणताही वाद, तक्रार किंवा कायदेशीर कार्यवाही उद्भवल्यास, लागू कायद्याच्या अधीन राहून बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथील सक्षम न्यायालयांना न्यायक्षेत्र राहील. संपर्क मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात 📞 7249314996 संपादक : श्री अमोल रजपूत 8169324814 कार्यकारी संपादक : सहकार्यकारी संपादक : उपकार्यकारी संपादक : जिल्हा संपादक : जिल्हा उपसंपादक : विकास तिखे कायदेशीर सल्लागार : अँड. आनंद थोरात वेब पोर्टल : www.vedhjanshakticha.in “शक्ती जनतेची, वेध सत्याचा!” — वेध जनशक्तीचा संपादकीय विभाग बातमी अधिक ठाम आणि दबावाला उत्तर देणारी आहे, विशेषतः “बातमी आवडली नाही म्हणून हटविली जाणार नाही” आणि वार्ताहरांकडून पोर्टलच्या नावाचा गैरवापर केला जाणार नाही या बाबतीत. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??