जिल्हाराजकीय

अत्याधुनिक एलिव्हेटेड फ्लायओव्हर उभारण्यात येणार ; शिरूर-हवेली आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या पाठपुराव्याने यश…

पुणे ते शिरुर एलिव्हेटेड फ्लायओव्हर प्रकल्पाचे काम मार्चअखेर मार्गी लागणार...

                                                     संग्रहित फोटो

पुणे (हवेली) : १५ फेब्रुवारी २०२५ वाघोली : पुणे ते शिरूर होणाऱ्या अत्याधुनिक एलिव्हेटेड फ्लायओव्हर उभारण्यात येणार असून भूसंपादनापूर्वी शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला ठरवून देणे आदी कामांकरिताचे प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आले असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम मार्च २०२५ मध्ये सुरू करण्याबाबत शासनाने सकारात्मकता दर्शविली आहे, असे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले.

शिरूर-हवेली आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी वाघोलीतील वाहतूक कोंडी बाबत उपाय योजना करण्यासाठी बैठक घेतल्यानंतर प्रशासनाने सर्जिकल स्ट्राईकने महामार्गाच्या कडेची अतिक्रमणे काढली.त्यानंतर कटके यांनी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील पुणे ते शिरूर या एलिव्हेटेड फ्लायओव्हरच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात होण्यासाठी पाठवपुराव्यास सुरवात केली आहे.

मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ विभागाचे मुख्य अभियता रणजीत हांडे यांच्याशी सदर प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.शिरूर-हवेली मतदारसंघासाठी महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या य ६० कि.मी. लांबीच्या प्रकल्पाची तातडीने सुरुवात करण्याबाबत संबंधीत विभागानेही सकारात्मकता दर्शविली आहे.

हा अत्याधुनिक उड्डाणपूल खराडी पासून ते शिरूर बायपास पर्यंत होणार आहे. खराडी, लोणीकंद, शिक्रापूर, रांजणगाव आणि शिरूर या पाच ठिकाणी उड्डापुलाला एक्झीट असणार आहे. या तीन मजली उड्डाणपुलामुळे पुणे-नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या कायम ची मार्गी लागणार असल्याचे आमदार कटके यांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पांकरिता भूसंपादनापूर्वी बाधित शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे.राज्यशासन शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देणार असून या कामाला प्रत्यक्षात मार्च २०२५ च्या महिन्याच्या अखेरीस सुरूवात होणार आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर पुणे शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??