राजकीय

रणसिंग महाविद्यालयाच्या बंदिस्त प्रेक्षागृहासाठी एक कोटी निधीची क्रिडा मंत्री दत्तात्रय भऱणे यांची घोषणा..

डॉ. गजानन टिंगरे

पुणे (इंदापूर) : इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता.इंदापूर महाविद्यालयात विश्वास महोत्सव स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला. विश्वास महोत्सव स्नेहसंमेलनाचे उद्घाटन वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्नेहसंमेलनाला क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुभेच्छा देत स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी महाविद्यालयात विविध कला गुणदर्शन सादर करण्याची संधी विश्वास महोत्सवांमधून मिळत असल्याचे सांगितले. संस्थेने माझ्यासाठी खूप केले आहे ते मी विसरणार नाही असे सांगत जीवनात आनंद द्यायचा व घ्यायचा असतो.विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये खेळामध्ये भाग घ्यायचा असतो .आयुष्यात शेवटी काय असते, हसत खेळत राहायचे,कष्ट केल्याशिवाय मेहनत केल्याशिवाय कोणतीही गोष्ट मिळत नसल्याचे सांगत इच्छाशक्ती प्रबळ ठेवून आयुष्यातील न्यूनगंड दूर सारून यशस्वीपणे वाटचाल केल्यास जीवनात यश मिळत असल्याचे मंत्री भरणे यांनी सांगितले. जीवनात कष्ट, मेहनत, घाम गाळल्याशिवाय कोणती गोष्ट मिळत नसल्याचे सांगत जादूची कांडी फिरवल्यासारखे यश लगेच मिळत नसल्याचे सांगितले. आयुष्यात पुढे जायचे असेल तर प्रबळ इच्छाशक्ती शिवाय आयुष्यातील यशस्वी मार्ग सापडत नसल्याचे तर न्यूनगंड दूर ठेवून जीवनातील काटे ,संकटे दूर करून आयुष्याला यशस्वीपणे वाटचाल करता येत असल्याचे सांगितले. आपल्या संस्थेचा व महाविद्यालयातील प्राध्यापकांचा तसेच आपल्या आई-वडिलांचा नेहमी मान ठेवला पाहिजे त्यांची सेवा आपल्या हातून झाली पाहिजे असे मत भरणे यांनी व्यक्त केले. संस्थेच्या माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी विद्यालयातील विद्यार्थिनी यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मान होणे ही संस्थेच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले. कॉलेजच्या विद्यार्थ्यांमुळेच आपणाला प्रेरणा मिळत असून आजही मी स्वतःला विद्यार्थी समजत असल्याचे मंत्री भरणे यांनी सांगितले. महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल होत असताना महाविद्यालयासाठी बंदिस्त प्रेक्षाग्रहासाठी एक कोटी निधी मंजूर करणार असल्याची घोषणा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.

स्वर्गीय विश्वास दादा रणसिंग व स्वर्गीय आण्णासाहेब हेगडे यांनी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला असून त्यांची दुसरी पिढी यशस्वीपणे संस्था चालवत असल्याचे सांगितले.संस्था सचिव वीरसिंह रणसिंग यांनी संस्था व रणसिंग कुटुंब शेवटचा श्वास असेपर्यंत भरणे मामा तुमच्या सोबत राहणार असल्याची ग्वाही दिली. मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते माध्यमिक विद्यालय म्हसोबाची वाडी विद्यालयाच्या हॉलीबॉल संघाने खासदार चषक मिळवल्याबद्दल विद्यार्थी व पालकांचा सन्मान मंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.राष्ट्रीय खेळाडू स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थिनी काजल जाधव हीचा सन्मान मंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष आनंदी रणसिंग,उपाध्यक्ष प्रकाश कदम, सचिव वीरसिंह रणसिंग,विश्वस्त कुलदीप हेगडे, शंकरराव रणसिंग राही रणसिंग ,प्राचार्य विजय केसकर ,उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग , स्नेहसंमेलन अध्यक्ष राजेंद्रकुमार डांगे, सांस्कृतिक विभाग प्रमुख विद्या गुळीग,क्रीडा संचालक सुहास भैरट,श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना संचालक अभिजीत रणवरे, वालचंद विद्यालय प्राचार्य सुरेश अर्जुन,मुख्याध्यापक प्रमोद भोंग,मुख्याध्यापिका मंगल सूर्यवंशी,निमसाखर सरपंच धैर्यशील रणवरे, कुरवली सरपंच राहुल चव्हाण,चिखली सरपंच उत्तम खोमणे,पोलीस पाटील विलास कणसे,पंचायत समिती माजी सदस्य सुहास डोंबाळे ,किसनराव पोळ ग्रामपंचायत सदस्य योगेश डोंबाळे,संदीप पाटील इत्यादी व कुरवली,चिखली,कळंब,वालचंदनगर, रणगाव ,निमसाखर , निरवांगी परिसरातील पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

वेध जनशक्तीचा शक्ती जनतेची, वेध सत्याचा! सूचना, अस्वीकरण व संपादकीय धोरण “वेध जनशक्तीचा” हे पुणे येथून कार्यरत असलेले स्वतंत्र वेब न्यूज पोर्टल असून, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय, गुन्हेगारी तसेच विविध जनहिताच्या विषयांवरील बातम्या आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, वृत्त, निवेदने, छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अन्य सामग्री ही उपलब्ध कागदपत्रे, अधिकृत माहिती, प्रत्यक्षदर्शी, संबंधित व्यक्ती, प्रतिनिधी, वार्ताहर तसेच विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार प्रकाशित केली जाऊ शकते. बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार जनहिताच्या दृष्टीने आवश्यक, महत्त्वाची किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याचा संपादकीय निर्णयाचा अधिकार “वेध जनशक्तीचा” राखून ठेवते. कोणत्याही व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणा, व्यावसायिक संस्था अथवा इतर घटकाविषयी बातमी प्रसिद्ध झाल्याने त्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध पूर्वग्रह किंवा वैयक्तिक वैर असल्याचे समजले जाऊ नये. बातमीमध्ये एखाद्या व्यक्तीवर आरोप, तक्रार, गुन्हा, चौकशी, कारवाई किंवा अन्य गंभीर बाब नमूद असल्यास, उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे ती बाब वाचकांसमोर मांडण्याचा पत्रकारितेचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आरोप प्रसिद्ध होणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरल्याचे मानले जाणार नाही. अंतिम सत्यता ठरविण्याचा अधिकार संबंधित सक्षम न्यायालय अथवा कायदेशीर प्राधिकरणास आहे. खोटी माहिती, दबाव व धमक्यांना थारा नाही “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाच्या दबावाखाली येऊन जनहिताच्या बातम्या मागे घेणे, बदलणे किंवा प्रसिद्ध न करणे यास बांधील राहणार नाही. तसेच, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर धमकी, दबाव, राजकीय हस्तक्षेप, वैयक्तिक आरोप, सोशल मीडिया दबाव किंवा अन्य कोणत्याही अनुचित मार्गाने संपादकीय निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न स्वीकारला जाणार नाही. मात्र, बातमीमध्ये वस्तुनिष्ठ तथ्यात्मक चूक असल्याचे विश्वसनीय पुराव्यांसह निदर्शनास आणून दिल्यास त्याची निष्पक्षपणे पडताळणी केली जाईल. दुरुस्ती, खुलासा व हरकत एखाद्या बातमीतील माहिती चुकीची, अपूर्ण किंवा वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचा दावा असल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्थेने केवळ तोंडी आक्षेप नोंदविण्याऐवजी— 👉संबंधित बातमीची लिंक, 👉चुकीची माहिती नेमकी कोणती आहे याचा स्पष्ट उल्लेख, 👉अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय पुरावे, 👉स्वतःची अधिकृत बाजू/खुलासा, 👉आवश्यक असल्यास संपर्काची माहिती आमच्याकडे उपलब्ध करून द्यावी. प्राप्त कागदपत्रे व माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आल्यास संबंधित बातमीमध्ये आवश्यक दुरुस्ती, स्पष्टीकरण, अद्ययावत माहिती किंवा अन्य योग्य संपादकीय कार्यवाही करण्यात येईल. केवळ बातमी आवडली नाही, प्रतिष्ठेला धक्का बसला, टीका झाली किंवा बातमी हटविण्याची मागणी करण्यात आली म्हणून बातमी आपोआप हटविली जाणार नाही. वार्ताहर व प्रतिनिधींबाबत महत्त्वाची सूचना “वेध जनशक्तीचा”शी संबंधित सर्व वार्ताहर, प्रतिनिधी व अन्य व्यक्तींनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेतच काम करावे. कोणत्याही व्यक्तीकडून पैशांची मागणी, खंडणीसदृश व्यवहार, वैयक्तिक लाभाची मागणी, धमकी, दबाव, ब्लॅकमेलिंग किंवा पोर्टलच्या नावाचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची वैयक्तिक राहील. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. स्रोत व गोपनीयता पत्रकारितेच्या कामकाजात प्राप्त होणाऱ्या काही माहितीचे स्रोत गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असू शकते. अशा वेळी कायदा व पत्रकारितेच्या मान्य तत्त्वांच्या अधीन राहून स्रोताची माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार संपादकीय विभाग राखून ठेवतो. तृतीय-पक्षाची सामग्री वाचकांच्या प्रतिक्रिया, निवेदने, जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, छायाचित्रे किंवा अन्य तृतीय-पक्षाची सामग्री प्रसिद्ध झाल्यास त्यातील प्रत्येक विधान हे पोर्टलचे अधिकृत मत असेलच असे नाही. अशा सामग्रीची जबाबदारी संबंधित सामग्री पुरविणाऱ्या व्यक्ती/संस्थेची राहू शकते. ⚠️ अंतिम महत्त्वाची नोंद “वेध जनशक्तीचा” हे सत्य, तथ्याधारित, जबाबदार आणि जनहिताची पत्रकारिता करण्यास कटिबद्ध आहे. अनावधानाने किंवा उपलब्ध माहितीच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या सामग्रीमध्ये तथ्यात्मक त्रुटी आढळल्यास योग्य पुराव्यांच्या आधारे त्याची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. मात्र, बातमीतील तथ्यात्मक चूक आणि बातमीमुळे निर्माण झालेली नाराजी या दोन वेगळ्या बाबी आहेत. तथ्यात्मक चूक सिद्ध झाल्यास दुरुस्ती केली जाईल; परंतु केवळ बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे निर्माण झालेला दबाव, नाराजी किंवा विरोध हा बातमी मागे घेण्याचा स्वयंचलित आधार मानला जाणार नाही. “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्तीची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करत नाही; त्याचप्रमाणे जनहिताशी संबंधित सत्य, अधिकृत आणि पडताळणीयोग्य माहिती केवळ कोणाला अप्रिय वाटते म्हणून दडपण्याचेही धोरण नाही. सर्व कायदेशीर बाबींमध्ये लागू असलेले भारतीय कायदे व सक्षम न्यायालय/प्राधिकरणाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील. न्यायक्षेत्र (Jurisdiction) या पोर्टलशी संबंधित कोणताही वाद, तक्रार किंवा कायदेशीर कार्यवाही उद्भवल्यास, लागू कायद्याच्या अधीन राहून बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथील सक्षम न्यायालयांना न्यायक्षेत्र राहील. संपर्क मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात 📞 7249314996 संपादक : श्री. धनंजय काळे 📞 9665221813 कार्यकारी संपादक : सहकार्यकारी संपादक : उपकार्यकारी संपादक : जिल्हा संपादक : जिल्हा उपसंपादक : विकास तिखे कायदेशीर सल्लागार : अँड. आनंद थोरात वेब पोर्टल : www.vedhjanshakticha.in “शक्ती जनतेची, वेध सत्याचा!” — वेध जनशक्तीचा संपादकीय विभाग बातमी अधिक ठाम आणि दबावाला उत्तर देणारी आहे, विशेषतः “बातमी आवडली नाही म्हणून हटविली जाणार नाही” आणि वार्ताहरांकडून पोर्टलच्या नावाचा गैरवापर केला जाणार नाही या बाबतीत. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??