क्राईम न्युजजिल्हासामाजिक

फुरसुंगी पोलीसांकडून धडाकेबाज कामगीरी देहविक्रीचा अपव्यापार करणारे ०४ आरोपी विरुध्द गुन्हा दाखल तसेच ०४ महीलांची सुटका “

फुरसुंगी (पुणे): फुरसुंगी पोलिसांनी देहविक्रीच्या अपव्यापाराविरोधात मोठी व धडाकेबाज कारवाई करत चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या कारवाईत चार पीडित महिलांची यशस्वी सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री उशिरा करण्यात आली असून, फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम राबवली.

फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, अजय म्हस्केअक्षय नावाचे इसम मोबाईलद्वारे ग्राहकांशी संपर्क साधत होते. हे आरोपी व्हॉट्सअॅप कॉल करून ग्राहकांना महिलांचे फोटो पाठवत, त्यानंतर ग्राहकांकडून महिलांची निवड करून घेत हांडेवाडी परिसरातील विविध लॉजमध्ये महिलांना पाठवून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ कारवाईचे नियोजन करत क्रिस्टल एक्झिक्युटिव्ह लॉज, मंतरवाडी–कात्रज बायपास रस्त्यालगत, ऊरळी देवाची, पुणे या ठिकाणी बनावट गिऱ्हाईक पाठवला. बनावट गिऱ्हाईकमार्फत संशयित आरोपींशी व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधून महिलांचे फोटो मागवण्यात आले. त्यानुसार एकूण चार महिलांना सदर लॉजमध्ये बोलावण्यात आले. बातमी खरी असल्याची खात्री झाल्यानंतर फुरसुंगी पोलिसांनी दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे १०.२० वाजण्याच्या सुमारास क्रिस्टल एक्झिक्युटिव्ह लॉजवर अचानक छापा टाकला. या छाप्यात एक बनावट गिऱ्हाईक व चार महिलांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या महिलांकडे चौकशी केली असता, अजय म्हस्के, अक्षय, सुधाकर तसेच पवन व बिंदा (पूर्ण नाव व पत्ता अद्याप अज्ञात) यांनी संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशांचे आमिष दाखवून जबरदस्तीने देहविक्रीच्या व्यवसायात ढकलल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४२/२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १४३ (२), १४३ (३), ३ (५) तसेच अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलांची तात्काळ सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून, आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात येत आहेत.

ही संपूर्ण कारवाई पोलीस उपआयुक्त सागर कवडे (परिमंडळ – ६, पुणे शहर) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले (लोणी काळभोर विभाग) यांच्या देखरेखीखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक महेश नलवडे, कोमल जाधव, पळसे, काळे, गायकवाड, उबाळे, कांबळे, गुरव, कामठेइंगवले यांच्यासह फुरसुंगी पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेत प्रशंसनीय कामगिरी बजावली.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे हे करत असून, या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास अधिक वेगाने सुरू असल्याचे फुरसुंगी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??