क्राईम न्युज

(ड्राय डे) दिवशी बेकायदेशीररीत्या देशी-विदेशी दारूची चढ्या दामाने विक्री ; लोणी काळभोर पोलीसांची कारवाई..

.

पुणे (हवेली) : महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी रोजी मद्य विक्री (ड्राय डे) करण्यास मनाई असतानाही त्याचा फायदा घेऊन बेकायदेशीररीत्या देशी-विदेशी दारूची चढ्या दामाने विक्री करणाऱ्याला लोणी काळभोर पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई पोलिसांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वीरे दा ढाब्याच्या पाठीमागे शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास केली आहे.

या प्रकरणी चक्रधर शिरगीरे यांनी सरकारच्या वतीने दिलेल्या फिर्यादीवरून सागर बसवराज सोनकटले (वय २२, रा. पठारेवस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि.पुणे. मुळ रा. मु.पो. अशलर, ता. लोहारा, जि. धाराशीव) याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘ड्राय डे’ च्या दिवशी जर कोणी अवैधरित्या दारूची विक्री करीत असेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असे आदेश पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिसांना दिले होते. मिळालेल्या आदेशानुसार लोणी काळभोर पोलिसांचे तपास पथक लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. पोलीस पथकातील पोलीस अंमलदार चक्रधर यांना एक इसम कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वीरे दा ढाब्याच्या पाठीमागे बेकायदा देशी-विदेशी दारूची विक्री करीत आहे, अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे अनुषंगाने सदर ठिकाणी छापा टाकला. तेथे सागर सोनकटले हा अवैध दारूची विक्री करताना आढळून आला.

पोलिसांनी या कारवाईत दोन हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या असून सोनकटले याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार गणेश सातपुते, पोलीस अंमलदार चक्रधर शिरगिरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??