जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

दौंड-शिरूरमधील भरनियमना विरोधातील आंदोलनाला यश ; महावितरणकडून मागण्या मान्य…

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल नेवसे यांच्या आंदोलनाला यश १५ दिवसांची प्रशासनाने वेळ घेतली.

दौंड : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून दौंड आणि शिरूर तालुक्यात संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत करण्यात येणाऱ्या भरनियमनाविरोधात दि. ४ मे २०२६ पासून आमरण उपोषण आंदोलन अनिल नेवसे यांच्या वतीने सुरू करण्यात आले होते.

या आंदोलनाला अखेर यश मिळाले असून, सामाजिक कार्यकर्ते / माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल नेवसे महावितरण यांच्या प्रशासनाने मागण्या मान्य करत पंधरा दिवसांचा अवधी मागितला आहे. याबाबत आंदोलकांना लेखी पत्र देण्यात आले.

या चर्चेदरम्यान महावितरणचे आल्हाट, कटके, चौगुले, टेंगले यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र नांनगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत उघडे, समुदाय आरोग्य अधिकारी अमृता ढेबे, आरोग्य सहाय्यक राणू नेवसे, आरोग्य सेविका बी. एम. ढाके तसेच पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून समन्वय साधला.

दौंड आणि शिरूर तालुक्यातील वीज ग्राहकांच्या हितासाठी करण्यात आलेल्या या आंदोलनाला विविध सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला होता. पुरोगामी संघटना महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय फुले ब्रिगेड, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, त्रिदल महिला शक्ती आघाडी महाराष्ट्र राज्य, ग्राहक कल्याण फाउंडेशन, माहिती अधिकार कार्यकर्ते महाराष्ट्र आदी संघटनांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.

आंदोलनात इब्राहिम शेख, शेलार, अमर जोगदंड, मारुती पठारे, अमोल भागवत, गणेश जगताप, आप्पा कवठाळे, तुकाराम निंबाळकर, सुरेश पवार, जनार्दन मोटे, ठोंगे महाराज, पद्माकर देशमुख, सोमनाथ सकट, दिलीप रुपनवर, जीवन मोटे, बिट्टू खोडवे, साईनाथ शिंदे, सतीश खताळ, रोहिदास चोरमले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. तसेच सारिका आढागळे, सारिका भुजबळ, सविता सोनवणे, मंगल नेवसे, मोनिका ताडगे, कोमल नेवसे, सुनीता मगर यांच्यासह महिला भगिनींचाही मोठा सहभाग होता.

विशेषतः सामाजिक कार्यकर्ते राजू आढागळे आणि ग्रामपंचायत सदस्य शेखर सोडनवर यांनी आंदोलनाचे उत्कृष्ट नियोजन केले. तर शिवाजी फराटे, तुकाराम निंबाळकर, गणेश थोरात, भिवाजी गरदडे, भानुदास नेवसे, डॉ. खताळ, सुनील मोहिते, धुळाजी सोडनवर, महेश भागवत, अर्जुनराव टूले यांनी समेट घडवून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते महाराष्ट्र आणि ग्राहक कल्याण फाउंडेशन, अनिल नेवसे यांच्या वतीने आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे आभार मानण्यात आले.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??