जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

लोणी काळभोर–कदमवाकवस्ती–वडकी परिसरात शितल कांबळे यांच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद…

कदमवाकवस्ती : जिल्हा परिषद गट क्रमांक ४१ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व वडकी परिसरात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून, या प्रचारात शितल सुजित कांबळे यांना मतदारांकडून मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. कोणताही पक्ष किंवा झेंडा नसतानाही जनतेशी थेट संवाद, साधेपणा आणि सामाजिक कार्याच्या बळावर शितल कांबळे यांनी अल्पावधीतच मतदारांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधताना शितल कांबळे यांना युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी उसळत असून, त्यांच्या कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. परिसरातील मूलभूत प्रश्न, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, महिला सशक्तीकरण, युवकांसाठी संधी तसेच शैक्षणिक विकास या मुद्द्यांवर त्यांनी मांडलेली भूमिका मतदारांना भावत असल्याचे दिसून येत आहे.

निवडणुकीतील चुरस दिवसेंदिवस वाढत असतानाच शितल कांबळे यांच्या उमेदवारीबाबत परिसरात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. “ना पक्ष, ना झेंडा, तरीही लोकप्रियतेच्या शिखरावर” अशी चर्चा नागरिकांमध्ये होत असून, सक्षम, स्वच्छ प्रतिमेचे व जनतेत मिसळणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

शितल कांबळे यांचे पती व सामाजिक कार्यकर्ते सुजित कांबळे यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य, जनसंपर्क तसेच नातेवाईक, मित्रपरिवार आणि पै पाहुण्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. “उमेदवार असावा तर शितल कांबळे यांच्यासारखा असावा,” असा सूर लोणी काळभोर, कदमवाकवस्ती आणि वडकी परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, आपण आजपर्यंत सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेशी जोडलेले राहिलो असून, त्याच विश्वासाच्या जोरावर या निवडणुकीत जनता जनार्दनाचा कौल आपल्यालाच मिळेल, असा विश्वास शितल कांबळे यांनी व्यक्त केला आहे. आगामी काही दिवसांत प्रचाराचा वेग आणखी वाढण्याची शक्यता असून, जिल्हा परिषद गट क्रमांक ४१ ची निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??