क्राईम न्युजजिल्हामहाराष्ट्रसामाजिक

कलेच्या नावाखाली देहव्यापार ; स्वरांजली कला केंद्रावर पोलिसांचा छापा, २५ महिलांची सुटका…

सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई ; मानव तस्करी रॅकेट उघडकीस, अनेक आरोपींवर गुन्हा...

सोलापूर : माढा तालुक्यातील मोडनिंब येथे सुरू असलेल्या स्वरांजली कला केंद्राच्या आड चालणाऱ्या देहव्यापार रॅकेटचा सोलापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सापळा रचून केलेल्या धाडीत तब्बल २५ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन आयपीएस राहुल आत्राम यांनी नियोजनबद्ध सापळा रचून केंद्रावर छापा टाकला. या कारवाईत मोठ्या प्रमाणात अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले असून यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणी स्वरांजली कला केंद्राचे मालक जगन्नाथ तुकाराम घाडगे, चालक विशाल पवार, मॅनेजर बाळासाहेब गिड्डे, तथाकथित ‘पार्टी मालकीण’ छाया सुरवसे, रिक्षाचालक नितीन चव्हाण आणि स्वागत लॉजचे मॅनेजर सिद्धांत गायकवाड यांच्यावर मानव तस्करी व अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्व आरोपींना माढा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

छाप्यात केंद्रातून मोठ्या प्रमाणात अश्लील साहित्य, मोबाईल फोन व रेकॉर्डिंग उपकरणे जप्त करण्यात आली. बाहेरून महिलांना आणून त्यांना जबरदस्तीने येथे ठेवण्यात येत होते. नृत्याच्या नावाखाली ग्राहकांसोबत अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

दरम्यान, या प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण मिळाले असून बीड जिल्ह्यातील उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणातील संशयित नर्तिका पूजा गायकवाड हिचा देखील सुटका करण्यात आलेल्या महिलांमध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या रॅकेटचे धागेदोरे इतर जिल्ह्यांपर्यंत पसरले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या कारवाईत पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात यापूर्वीच अनेक कला केंद्रांवर कारवाई करत परवाने रद्द करण्यात आले होते. त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातही अशा प्रकारचा रॅकेट उघड झाल्याने राज्यभरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर मोठी कारवाई होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??