जिल्हाशिक्षणसामाजिक

वकिलांनी टेक्नो-सॅव्ही व्हावे!, डॉ. हेरॉल्ड डिकोस्टा …

एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातील चर्चासत्रात तज्ज्ञांचे मत...

पुणे : डिजिटल युगात तंत्रज्ञानाची झपाट्याने झालेली प्रगती न्यायव्यवस्थेपुढे मोठे आव्हान उभे करत आहे. परदेशी सर्व्हरवरून ई-पुरावे मिळवणे, क्रिप्टो व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे, क्युआर कोड फसवणूक रोखणे आणि न्यायप्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) योग्य वापर करणे या तातडीच्या गरजा आहेत. अशा गुंतागुंतीच्या प्रकरणांत वकिलांनी टेक्नो-सॅव्ही होणे अत्यावश्यक असल्याचे मत सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. हेरॉल्ड डिकोस्टा यांनी व्यक्त केले.

एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ लॉ’तर्फे “आधुनिक काळातील कायदेशीर आव्हाने : वकील व कायदेतज्ज्ञांसमोरील शैक्षणिक दृष्टीकोन” या एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी डॉ. डिकोस्टा प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

या वेळी बीव्हीजी इंडियाचे उपाध्यक्ष अमोल उमराणीकर, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या प्रोव्होस्ट प्रा. डॉ. सायली गणकर, लोकमान्य टिळक लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. केतकी दळवी, डॉ. मोहिनी सुर्यवंशी, स्कूल ऑफ लॉचे प्रा. डॉ. गोविंद राजपाल आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. डिकोस्टा म्हणाले, “ई-मेल गैरवापर, अनधिकृत संकेतस्थळांवरील अवैध विक्री, क्रिप्टो व केवायसीशी संबंधित गुन्हे, क्युआर कोड फसवणूक अशा गुन्ह्यांत सातत्याने वाढ होत आहे. आर्थिक फसवणूक थोपवण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी तर गरजेची आहेच; पण त्याहूनही वकील, पोलीस व विद्यार्थी यांनी सायबर फॉरेन्सिक्स व डिजिटल पुरावे मिळवण्याच्या पद्धतींचा अभ्यास करणे आवश्यक आहे.” त्यांनी तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो, याकडेही लक्ष वेधले.

प्रोव्होस्ट डॉ. सायली गणकर यांनी यावेळी स्पष्ट केले की, “एआय तंत्रज्ञान न्यायास मदत करेल; मात्र न्याय निवाड्याचा आत्मा मानवी विवेकातच आहे.”

कायद्याच्या शिक्षणात तंत्रज्ञान आवश्यक – डॉ. गणकर

डॉ. गणकर पुढे म्हणाल्या, “कायद्याच्या शिक्षणात तंत्रज्ञान व नैतिकता समाविष्ट करणे ही काळाची गरज आहे. एमआयटी एडीटी स्कूल ऑफ लॉने बीबीए एलएलबी, एलएलएम, एलएलबी यांसह पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि लेबर वेलफेअर डिप्लोमामध्ये आधुनिक तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, फॉरेन्सिक व एआय टूल्स यांसारखे विषय समाविष्ट केले आहेत. हे अभ्यासक्रम एचआर मॅनेजर्स, आयटी कर्मचारी, डॉक्टर्स आणि उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील.

वकिली पेशाचे उज्वल भविष्य…

चर्चासत्रात डॉ. केतकी चितळे यांनी विद्यार्थ्यांना वास्तवदर्शी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “अलीकडे तंत्रज्ञानाच्या मदतीने कृत्रिम गर्भाशय तयार झाल्याची माहिती आली आहे. यामुळे पुनरुत्पादनासाठी स्त्रियांची आवश्यकता कमी होऊ शकते. मात्र, यामधून अनेक कायदेशीर पेच निर्माण होणार आहेत. म्हणून भविष्यात वकिली पेशाची मागणी प्रचंड वाढेल.

दुसरे सत्र : सामाजिक बदल व घटनात्मक तत्त्वांचे संतुलन

दुसऱ्या सत्रात ‘सामाजिक बदलांसह घटनात्मक तत्त्वांचे संतुलन’ या विषयावर डॉ. नागेश कुमार, ॲड. विभाकर रामतीर्थकर, डॉ. दीप्ती लेले, ॲड. विश्वास खराबे, ॲड. योगेश पवार, ॲड. मंगेश खराबे आदी तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. त्यांनी विद्यार्थ्यांना न्यायालयीन कामकाज व भारतीय घटनेतील बदलांचा अभ्यास करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??