क्राईम न्युज

गुन्हे शाखेच्या धाडीत मेफेड्रॉन व डोडा चुरा जप्त; दोघांना अटक, २१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत…धानोरीत अंमली पदार्थांचा साठा उघड..

पुणे : शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात गुन्हे शाखेने सुरू केलेल्या मोहिमेत आणखी एक मोठे यश मिळाले असून धानोरी परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ने धडक कारवाई करत दोन संशयितांना अटक केली आहे. या कारवाईत मेफेड्रॉन (एम.डी.) आणि डोडा चुरा असा अंमली पदार्थांसह तब्बल २१ लाख १३ हजार ७४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ला दि. १५ मे २०२६ रोजी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. धानोरी येथील सिद्धार्थनगर परिसरातील चक्रधर निवास येथे काही व्यक्ती अंमली पदार्थांचा साठा करून त्याची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला.

छापेमारी दरम्यान पोलिसांनी करणसिंह प्रेमसिंह राजपुरोहित (वय ४१, रा. चक्रधर निवास, सिद्धार्थनगर, धानोरी, पुणे, मूळ रा. पाली, राजस्थान) आणि राजुसिंह सहदेवसिंह राजपुरोहित (वय ४२, रा. सुखसागरनगर, पुणे, मूळ रा. जालोर, राजस्थान) या दोघांना ताब्यात घेतले.

तपासणीदरम्यान आरोपींकडून १०२.९१ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा महागडा अंमली पदार्थ, १०२.३८ ग्रॅम डोडा चुरा, दोन मोबाईल फोन, रोख रक्कम तसेच अंमली पदार्थांचे वजन करण्यासाठी वापरण्यात येणारा इलेक्ट्रिक वजनकाटा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २१ लाख १३ हजार ७४८ रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २३२/२०२६ अन्वये एन.डी.पी.एस. कायद्यातील कलम ८(क), २१(क), १७(अ) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अंमली पदार्थांची विक्री कोणाला करीत होते, त्यांचे आणखी साथीदार आहेत का, तसेच या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त विवेक मासाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

अंमली पदार्थ विरोधी पथक-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक यांच्यासह पोलीस अंमलदार राजस शेख, योगेश कुंभार, सतीश चव्हाण, प्रशांत कळसकर, शरद धांडे, अमोल सोनवणे, संदीप देवकाते, देविदास वांढरे, दिनेश बास्टेवाड तसेच महिला पोलीस अंमलदार सुकेशिनी आंबले, सुरेखा साबळे, आरती दिवेकर आणि वैशाली माकडी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??