आरोग्यजिल्हामहाराष्ट्रसामाजिक

समर्पण वृद्धाश्रमात दीपावली फराळ वाटप, समाजसेवेचा खरा दीप प्रज्वलित ; डॉ. लक्ष्मण मासाळ…

पुणे : हडपसर येथील “समर्पण ओल्ड एज होम” येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साह, आपुलकी आणि आनंदाच्या वातावरणात दीपावली फराळ वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे वृद्धाश्रमात सणासुदीचा उत्साह आणि समाजसेवेचा सच्चा सुगंध दरवळला.

या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे लोणी पोलीस स्टेशनचे एपीआय सोमनाथ नाळेरमेश वेठेकर (डीवायएसपी), होते. त्यांच्यासमवेत सुशील महाराज काळभोर, दिलीप सावणे (सहकार पत्रकार संघ अध्यक्ष), बाबासाहेब गायकवाड (महाराष्ट्र प्रदेश दलित पँथर उपाध्यक्ष), राजेंद्र कांबळे, तनाजी तापकिरे, विनायक भस्मारे, आज्जू सर, उत्तम सुतार, रनीताई खांदवे (महाराष्ट्र पोलीस), सागर जगदाळे (महाराष्ट्र पोलीस), राज्य मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्यकारिणी वरिष्ठ सदस्य सुनील थोरात, दुर्गाताई मगर, डॉ. नितीन वीर, चंद्रकांतदादा पवार, नितीन बेद्रे, कुमार बेद्रे आणि नितीन भांडवलकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

प्रास्ताविकात सोमनाथ पुणेकर यांनी सांगितले की, लक्ष्मण मसाळ यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या सामर्पण वृद्धाश्रमात सध्या ४१ आजी-आजोबांची सेवा केली जाते. येथे राहणाऱ्या प्रत्येक वृद्धासाठी भोजन, आरोग्य तपासणी, डॉक्टरांची नियमित भेट, फिजिओथेरपी, योगा आणि मनोरंजन अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

मुख्य पाहुणे एपीआय सोमनाथ नाळे म्हणाले…

“अशा प्रकारे वयोवृद्धांचे संगोपन करणे ही खरी देवसेवा आहे. लक्ष्मण मासाळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.”

डीवायएसपी रमेश वेठेकर यांनी ज्ञानेश्वरांच्या विचारांचा उल्लेख करत सामर्पणच्या सातत्यपूर्ण समाजसेवेचे कौतुक केले. तसेच दिलीप सावणेदुर्गाताई मगर यांनी संस्थेला आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर महेश कुळपे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सोमनाथ पुणेकर यांनी केले.

या प्रसंगी राजेंद्र कांबळ (कार्याध्यक्ष, सामर्पण ओल्ड एज होम) यांची महाराष्ट्र पत्रकार संघ उपाध्यक्ष पदी व सुनील थोरात यांची राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश राज्य कार्यकारिणी सदस्य वरिष्ठ पदी निवड झाल्याबद्दल सामर्पण व शिवनेरी फाऊंडेशन तर्फे संविधानाच्या फोटो फ्रेमद्वारे सन्मान करण्यात आला.

या स्नेहमेळाव्याने सामर्पण वृद्धाश्रमात आनंद, आपुलकी आणि सणासुदीचा प्रकाश उजळला, जिथे फराळासोबत समाजसेवेचा खरा दीप प्रज्वलित झाला!

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??