क्राईम न्युज

लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कारवाई : खुनाच्या प्रयत्नातील तिघे २४ तासांत जेरबंद, हत्यारांसह अटक…

लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी जलद आणि अचूक कारवाई करत खुनाच्या प्रयत्नातील तिन्ही आरोपींना अवघ्या २४ तासांच्या आत ताब्यात घेत मोठे यश मिळवले आहे. आरोपींकडून धारदार हत्यारे तसेच मोपेड दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या आदेशानुसार दिनांक १८ एप्रिल ते २४ एप्रिल २०२६ दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे तपास पथक, चौकी अधिकारी व बीट मार्शल पथक गस्त घालत असताना टोल नाका परिसरात काही इसम धारदार हत्यारांसह फिरत असल्याची माहिती मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सुरेश बाबुराव गायकवाड (वय १८), कुणाल राहुल चौगुले (वय १८) तसेच एक विधीसंघर्षित बालक (वय १७) यांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्याकडून धारदार हत्यारे व मोपेड वाहन जप्त करण्यात आले.

चौकशीत आरोपींनी पुणे-सोलापूर रोडवरील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ गणेश नवनाथ कांबळे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची कबुली दिली. जखमीवर उपचार सुरू असून मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. १६७/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ व भारतीय न्यायसंहिता कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मांजरी पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा रजि. नं. २४/२०२६ (कलम १०९, ११५(३), ३(५) इ.) देखील उघडकीस आणण्यात आला आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे व सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद जगताप, अंमलदार कर्डीले, पोलीस अंमलदार पुंडे, पोलीस हवालदार चंद्रकांत माने, पोलीस हवालदार सागर जगदाळे तसेच बीट मार्शलचे पोलीस अंमलदार दिपक गायकवाडनिखिल मेमाणे, अशोक गिरी यांचा समावेश होता.

लोणी काळभोर पोलिसांच्या वेगवान आणि समन्वयित कारवाईमुळे गंभीर गुन्हा उघडकीस आला असून, आरोपींना वेळेत अटक करण्यात यश मिळाले आहे. यामुळे परिसरात सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??