क्राईम न्युज

देवदर्शनासाठी गेलेल्या १६ वर्षीय मुलीचे अपहरण ; अज्ञाताविरोधात गुन्हा…

लोणी काळभोर (ता. हवेली) : महाशिवरात्रीच्या निमित्ताने देवदर्शनासाठी घराबाहेर पडलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने फूस लावून अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना हवेली तालुक्यातील लोणी काळभोर परिसरात रविवारी (१५ फेब्रुवारी) सायंकाळी समोर आली असून, याप्रकरणी Loni Kalbhor Police Station येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब लोणी काळभोर परिसरात वास्तव्यास आहे. पीडित मुलीने सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर शाळा सोडली होती. रविवारी महाशिवरात्रीच्या औचित्याने “मंदिरात जाऊन येते” असे सांगून ती घरातून बाहेर पडली; मात्र सायंकाळपर्यंत ती घरी परतली नाही.

मुलीच्या आई-वडिलांनी परिसरात तसेच नातेवाईक व मैत्रिणींकडे चौकशी करून शोध घेतला; परंतु तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर अज्ञात इसमाने कशाचेतरी आमिष दाखवून मुलीला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत वडिलांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

त्यानुसार पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे करीत आहेत. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संबंधित मुलीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??