जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

लोणी काळभोर, कदमवाकवस्ती परिसरात ढगफुटी सदृश पावसाने वीजपुरवठा ठप्प ; महावितरणच्या वायरमननी जीव धोक्यात घालून १२ तासांत गावाला दिला दिलासा..

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : १४ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे लोणी काळभोर, कदमवाकवस्ती परिसरात अक्षरशः जलप्रलयाचे चित्र निर्माण झाले. रस्त्यांवरून नद्या वाहू लागल्या, घरात पाणी शिरल्याने दोन मीटरपर्यंत पाणी भरले आणि रात्री बारा वाजता संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा बंद करण्यात आला.

एमआयटी कॉर्नर, आयओसीएल कंपनी परिसर, कवडीपाट टोलनाका येथे उच्चदाब वीज वाहिन्यांचे सात ते आठ खांब पडले होते.

या भीषण परिस्थितीत लोणी काळभोरकदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील तब्बल २२ हजार ग्राहक अंधारात होते. उप कार्यकारी अभियंता महेश धाडवे, सहाय्यक अभियंता विक्रांत ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने पाण्यातून मार्ग काढत पाहणी सुरू केली. ग्राहकांनी “घरात पाणी आहे, कृपया वीज पुरवठा सुरू करू नका” असे विनंतीचे फोन केल्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे स्पष्ट झाले.

पाणी ओसरताच शाखा कार्यालयाचे लाईनमन पी. एस. खरमाटे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांचे दोन पथक करून फुरसुंगी फिडरपासून पुरवठा पूर्ववत करण्याची धडपड सुरू झाली.

संभाजीनगर येथील सिराज सय्यद, इंदिरानगर येथील अबू सय्यद, रामदारा येथील योगेश गिरी, लोणी गावातील अजय डोंगरे यांनी आपापल्या भागात मेहनत घेतली.

टोलनाका परिसरात पडझड झाल्याने वायरमन पांडुरंग खरात, अक्षय पाटीलरोहित काळभोर यांनी क्रेन बोलावून झाडे हटवली.

गावठाण व लोणी कॉर्नर परिसरात अमोल शेलारयोगेश गाडेकर यांनी पर्यायी लाईन खेचून पुरवठा सुरू केला. दादा चौधरीमुस्तफा शेख यांनी ट्रान्सफॉर्मर बंद करून माळी मळा व राहिंज वस्तीतील काम केले, तर विशाल मोरे, हिमांशू काळभोर, दादा आगळे यांनी इतर भाग सुरळीत केले.

अवघ्या १०-१२ तासांत महावितरण लोणी काळभोर शाखेने लोणी काळभोरकदमवाकवस्ती वीजपुरवठा पूर्ववत करून नागरिकांना दिलासा दिला. नागरिक, स्थानिक प्रतिनिधींच्या सहकार्यामुळे हे ‘मोठे काम सहज शक्य झाले’ असे महावितरणाचे सहाय्यक अभियंता विक्रांत ओहोळ यांच्याकडून सांगण्यात आले.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??