क्राईम न्युजजिल्हासामाजिक

“शिवसेना शिंदे गटाच्या निलेश काळभोरवर हल्ल्याचा कट उधळला ; दोघे अटकेत”

लोणी काळभोर, (ता. हवेली) : “निलेश काळभोरचा आज गेम वाजवायचा” असा आरडाओरडा करत हॉटेलमध्ये पिस्तूल व धारदार शस्त्रांसह दहशत माजवणाऱ्या चौघांपैकी दोन जणांना खंडणी विरोधी पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. त्यांच्या ताब्यातून दोन लोखंडी तलवारी, दोन सुरे आणि एक कोयता जप्त करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल व्यावसायिक सुर्यकांत बापुसाहेब उंद्रे (वय ४०, रा. मांजरी खुर्द) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रणवराज सुनिल यादव (वय २५, रा. मांजरी ग्रीन ॲनेक्स, मांजरी बुद्रुक) आणि जय गणेश शेलार (वय २५, रा. पवार रेसिडेन्सी, हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे.

रविवारी पहाटे दोनच्या सुमारास हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील “माईलस्टोन ०९” हॉटेलमध्ये चार जणांनी पिस्तूल व धारदार शस्त्रे हातात घेऊन जबरदस्तीने प्रवेश करत दहशत माजवली होती. “निलेश काळभोरचा गेम वाजवायचा होता” अशी धमकी देत त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस मांजरी परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की आरोपी प्रणवराज यादवजय शेलार हे धारदार शस्त्रांसह मांजरी ग्रीन ॲनेक्स परिसरात थांबले आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून दोन लोखंडी तलवारी, दोन सुरे आणि एक कोयता जप्त करण्यात आला.

ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखील पिंगळे व सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राम राजमाने, उपनिरीक्षक गौरव देव, नितीन मुंढे तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??