जिल्हा

राजमाता जिजाऊ यांनी अनेक आघात होऊनही राष्ट्रभक्तीचे संस्कार घडविले- हर्षवर्धन पाटील..

पुणे (इंदापुर) : स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त इंदापूर महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बोलत होते.

       पाटील पुढे म्हणाले की ,’ राजमाता जिजाऊ यांना आपल्या ७२ वर्षाच्या आयुष्यामध्ये खूप संकटाचा सामना करावा लागला परंतु अनेक आघात होऊनही राजमाता जिजाऊ यांनी राष्ट्रभक्तीचे संस्कार घडविले.’ सरदार कान्होजी जेधे यांचे १४ वे वंशज युवराज यशवंत जेधे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कामधेनु परिवाराचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण डॉ. लक्ष्मण आसबे यांनी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास सांगितला.

      सुरुवातीला सरदार कान्होजी जेधे यांच्या शिवकालीन तलवारीची शोभायात्रा काढण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यांचे मान्यवरांनी पूजन करून झाली. अमर शहीद जवान ज्ञानदेव लक्ष्मण पवार रा. पवारवाडी ता. इंदापूर यांच्या वीरपत्नी सौ. सावित्रीबाई ज्ञानदेव पवार यांना मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच वीरपत्नी सुवर्णाताई डोईफोडे आणि आजी-माजी सैनिकांच्या माता किंवा पत्नी यांचा शिवभक्त परिवाराच्या वतीने साडी व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. सीए परीक्षेत यश मिळवलेली श्री. नारायणदास रामदास हायस्कूल व इंदापूर महाविद्यालयाच्या पदव्युत्तर वाणिज्य ( एम कॉम ) विभागाची विद्यार्थिनी श्रद्धा आण्णासाहेब पाटील तसेच दिल्ली येथील राजपथावर परेडसाठी निवड झालेला इंदापूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचा विद्यार्थी ऋषिकेश शिंदे आणि वर्ल्ड सायंटिस्ट पुरस्कार मिळवलेले महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सुरेंद्र शिंदे व शिवप्रताप मर्दानी आखाडा पुरस्कार सन्मानित प्राप्तेश बर्गे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

      शिवप्रताप मर्दानी आखाडा पंधारवडी ता. इंदापूर येथील शिवभक्तांनी तलवारबाजी , दांडपट्टा , लाठीकाटी यासारख्या साहसी मर्दानी शिवकालीन युद्ध कला प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. श्री. नारायणदास रामदास विद्यालयातील विद्यार्थिनींनी देखील युद्ध कलेचे यावेळी प्रात्यक्षिक सादर केले. शिवभक्त परिवाराच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

    हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे. राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याच्या माँसाहेब होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक त्यांना पाहता आला. आपल्या गुणवत्ता आणि विद्वत्तेच्या जोरावर ज्यांनी आपले नाव जगामध्ये मोठे केले असे स्वामी विवेकानंद यांचा आदर्श नव्या पिढीने घेतला पाहिजे.’ युवराज यशवंत जेधे यांनी आपल्या घराण्याचा देदीप्यमान इतिहास सांगितला तसेच स्वराज्य कार्याचा प्रेरणा असणारा जेधे घराण्याचा कारी ता. भोर येथील वाडा पाहण्याचे त्यांनी आवाहन केले. डॉ. लक्ष्मण आसबे यांनी आपल्या व्याख्यानात विद्यार्थ्यांना इतिहासातील अनेक घटना, प्रसंग व त्यातील दाखले देत ऐतिहासिक माहिती दिली तसेच ते म्हणाले की जिजाऊंचे संस्कार आजच्या युवतींनी स्वीकारावे कारण त्यामध्ये चारित्र्य आणि राष्ट्र निर्मितीचे संस्कार आहेत. जन्मापासून संकटाचा सामना करणारे स्वराज्य निष्ठा असणारे सरदार कान्होजी जेधे यांचा छत्रपती शिवाजीराजांनी ‘ सर्जेराव’ किताब देऊन सन्मान केला. अशी कर्तबगार तत्कालीन पिढी घडविण्याचे कार्य राजमाता जिजाऊ यांनी केले.

       यावेळी संस्थेचे सचिव ॲड. मनोहर चौधरी ,संचालक तुकाराम जाधव , विलासराव वाघमोडे तसेच पंचायत समितीच्या माजी सभापती ऋतुजा पाटील , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे , उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे , विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर , श्री. नारायणदास रामदास हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सोरटे ,इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका फौजीया शेख, प्रा. कृष्णा ताटे, मेघश्याम पाटील, बाळासाहेब मोरे , धनंजय पाटील , मायाताई विंचू , राजेंद्र पवार , विकास मोरे , कैलास कदम , सागर गाणबोटे ,गोरख शिंदे ,रघुनाथ राऊत,ललेंद्र शिंदे ,संतोष देवकर हे उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. नारायणदास रामदास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुप्रिया आगरखेड यांनी केले. प्रा. स्वाती राऊत यांनी राज्य व राष्ट्रगीत म्हटले. रघुनाथ पन्हाळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिवभक्त परिवाराचे सदस्य प्रकाश खांबसवाडकर यांनी आभार मानले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

वेध जनशक्तीचा शक्ती जनतेची, वेध सत्याचा! सूचना, अस्वीकरण व संपादकीय धोरण “वेध जनशक्तीचा” हे पुणे येथून कार्यरत असलेले स्वतंत्र वेब न्यूज पोर्टल असून, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय, गुन्हेगारी तसेच विविध जनहिताच्या विषयांवरील बातम्या आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, वृत्त, निवेदने, छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अन्य सामग्री ही उपलब्ध कागदपत्रे, अधिकृत माहिती, प्रत्यक्षदर्शी, संबंधित व्यक्ती, प्रतिनिधी, वार्ताहर तसेच विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार प्रकाशित केली जाऊ शकते. बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार जनहिताच्या दृष्टीने आवश्यक, महत्त्वाची किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याचा संपादकीय निर्णयाचा अधिकार “वेध जनशक्तीचा” राखून ठेवते. कोणत्याही व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणा, व्यावसायिक संस्था अथवा इतर घटकाविषयी बातमी प्रसिद्ध झाल्याने त्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध पूर्वग्रह किंवा वैयक्तिक वैर असल्याचे समजले जाऊ नये. बातमीमध्ये एखाद्या व्यक्तीवर आरोप, तक्रार, गुन्हा, चौकशी, कारवाई किंवा अन्य गंभीर बाब नमूद असल्यास, उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे ती बाब वाचकांसमोर मांडण्याचा पत्रकारितेचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आरोप प्रसिद्ध होणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरल्याचे मानले जाणार नाही. अंतिम सत्यता ठरविण्याचा अधिकार संबंधित सक्षम न्यायालय अथवा कायदेशीर प्राधिकरणास आहे. खोटी माहिती, दबाव व धमक्यांना थारा नाही “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाच्या दबावाखाली येऊन जनहिताच्या बातम्या मागे घेणे, बदलणे किंवा प्रसिद्ध न करणे यास बांधील राहणार नाही. तसेच, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर धमकी, दबाव, राजकीय हस्तक्षेप, वैयक्तिक आरोप, सोशल मीडिया दबाव किंवा अन्य कोणत्याही अनुचित मार्गाने संपादकीय निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न स्वीकारला जाणार नाही. मात्र, बातमीमध्ये वस्तुनिष्ठ तथ्यात्मक चूक असल्याचे विश्वसनीय पुराव्यांसह निदर्शनास आणून दिल्यास त्याची निष्पक्षपणे पडताळणी केली जाईल. दुरुस्ती, खुलासा व हरकत एखाद्या बातमीतील माहिती चुकीची, अपूर्ण किंवा वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचा दावा असल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्थेने केवळ तोंडी आक्षेप नोंदविण्याऐवजी— 👉संबंधित बातमीची लिंक, 👉चुकीची माहिती नेमकी कोणती आहे याचा स्पष्ट उल्लेख, 👉अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय पुरावे, 👉स्वतःची अधिकृत बाजू/खुलासा, 👉आवश्यक असल्यास संपर्काची माहिती आमच्याकडे उपलब्ध करून द्यावी. प्राप्त कागदपत्रे व माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आल्यास संबंधित बातमीमध्ये आवश्यक दुरुस्ती, स्पष्टीकरण, अद्ययावत माहिती किंवा अन्य योग्य संपादकीय कार्यवाही करण्यात येईल. केवळ बातमी आवडली नाही, प्रतिष्ठेला धक्का बसला, टीका झाली किंवा बातमी हटविण्याची मागणी करण्यात आली म्हणून बातमी आपोआप हटविली जाणार नाही. वार्ताहर व प्रतिनिधींबाबत महत्त्वाची सूचना “वेध जनशक्तीचा”शी संबंधित सर्व वार्ताहर, प्रतिनिधी व अन्य व्यक्तींनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेतच काम करावे. कोणत्याही व्यक्तीकडून पैशांची मागणी, खंडणीसदृश व्यवहार, वैयक्तिक लाभाची मागणी, धमकी, दबाव, ब्लॅकमेलिंग किंवा पोर्टलच्या नावाचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची वैयक्तिक राहील. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. स्रोत व गोपनीयता पत्रकारितेच्या कामकाजात प्राप्त होणाऱ्या काही माहितीचे स्रोत गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असू शकते. अशा वेळी कायदा व पत्रकारितेच्या मान्य तत्त्वांच्या अधीन राहून स्रोताची माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार संपादकीय विभाग राखून ठेवतो. तृतीय-पक्षाची सामग्री वाचकांच्या प्रतिक्रिया, निवेदने, जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, छायाचित्रे किंवा अन्य तृतीय-पक्षाची सामग्री प्रसिद्ध झाल्यास त्यातील प्रत्येक विधान हे पोर्टलचे अधिकृत मत असेलच असे नाही. अशा सामग्रीची जबाबदारी संबंधित सामग्री पुरविणाऱ्या व्यक्ती/संस्थेची राहू शकते. ⚠️ अंतिम महत्त्वाची नोंद “वेध जनशक्तीचा” हे सत्य, तथ्याधारित, जबाबदार आणि जनहिताची पत्रकारिता करण्यास कटिबद्ध आहे. अनावधानाने किंवा उपलब्ध माहितीच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या सामग्रीमध्ये तथ्यात्मक त्रुटी आढळल्यास योग्य पुराव्यांच्या आधारे त्याची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. मात्र, बातमीतील तथ्यात्मक चूक आणि बातमीमुळे निर्माण झालेली नाराजी या दोन वेगळ्या बाबी आहेत. तथ्यात्मक चूक सिद्ध झाल्यास दुरुस्ती केली जाईल; परंतु केवळ बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे निर्माण झालेला दबाव, नाराजी किंवा विरोध हा बातमी मागे घेण्याचा स्वयंचलित आधार मानला जाणार नाही. “वेध जनशक्तीचा” कोणत्याही व्यक्तीची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने पत्रकारिता करत नाही; त्याचप्रमाणे जनहिताशी संबंधित सत्य, अधिकृत आणि पडताळणीयोग्य माहिती केवळ कोणाला अप्रिय वाटते म्हणून दडपण्याचेही धोरण नाही. सर्व कायदेशीर बाबींमध्ये लागू असलेले भारतीय कायदे व सक्षम न्यायालय/प्राधिकरणाचे आदेश अंतिम व बंधनकारक राहतील. न्यायक्षेत्र (Jurisdiction) या पोर्टलशी संबंधित कोणताही वाद, तक्रार किंवा कायदेशीर कार्यवाही उद्भवल्यास, लागू कायद्याच्या अधीन राहून बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथील सक्षम न्यायालयांना न्यायक्षेत्र राहील. संपर्क मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात 📞 7249314996 संपादक : श्री अमोल रजपूत 8169324814 कार्यकारी संपादक : सहकार्यकारी संपादक : उपकार्यकारी संपादक : जिल्हा संपादक : जिल्हा उपसंपादक : विकास तिखे कायदेशीर सल्लागार : अँड. आनंद थोरात वेब पोर्टल : www.vedhjanshakticha.in “शक्ती जनतेची, वेध सत्याचा!” — वेध जनशक्तीचा संपादकीय विभाग बातमी अधिक ठाम आणि दबावाला उत्तर देणारी आहे, विशेषतः “बातमी आवडली नाही म्हणून हटविली जाणार नाही” आणि वार्ताहरांकडून पोर्टलच्या नावाचा गैरवापर केला जाणार नाही या बाबतीत. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??