जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

फोनवरून गॅस बुक होत नाही? ‘या’ 3 सोप्या पद्धतीने करा सिलिंडर बुकिंग

मुंबई : सध्या इराण–इस्रायल संघर्षामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असून त्याचा फटका भारतालाही बसत असल्याचे चित्र आहे. नैसर्गिक वायू आणि एलपीजी गॅसच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे अनेक नागरिक घरगुती गॅस सिलिंडर वेळेवर मिळावा म्हणून फोन कॉलच्या माध्यमातून बुकिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र काही ठिकाणी फोन कॉलद्वारे गॅस बुकिंग करताना अडचणी येत असल्याने गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या रांगा लागल्याचे दिसत आहे.

अशा परिस्थितीत फोनवरून गॅस बुक होत नसेल, तर नागरिकांकडे गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी इतरही काही सोपे पर्याय उपलब्ध आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया.

1) व्हॉट्सअॅपद्वारे गॅस बुकिंग
ग्राहक व्हॉट्सअॅपच्या मदतीनेही घरगुती गॅस सिलिंडर बुक करू शकतात.

Indane Gas ग्राहकांनी आपल्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरून 7588888824 या क्रमांकावर REFILL असा व्हॉट्सअॅप मेसेज पाठवायचा.

HP Gas ग्राहकांनी 9222201122 या क्रमांकावर Hi किंवा Book असा व्हॉट्सअॅप मेसेज पाठवायचा.

Bharat Gas ग्राहकांनी 1800224344 या क्रमांकावर Hi किंवा Book असा व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून बुकिंग करू शकतात.

2) मोबाईल अॅपद्वारे बुकिंग
ग्राहक मोबाईल अॅपच्या माध्यमातूनही गॅस सिलिंडर सहज बुक करू शकतात. यासाठी UMANG अॅपचा वापर करता येतो. तसेच Paytm, PhonePe आणि Amazon Pay यांसारख्या ऑनलाइन पेमेंट अॅपमधूनही गॅस बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे.

3) एसएमएसद्वारे गॅस बुकिंग
फोन कॉल व्यतिरिक्त ग्राहक एसएमएस करूनही गॅस बुक करू शकतात.
Indane Gas ग्राहकांनी रजिस्टर मोबाईल नंबरवरून 7718955555 या क्रमांकावर REFILL असा एसएमएस पाठवावा.
Bharat Gas ग्राहकांनी 7715012345 किंवा 7718012345 या क्रमांकावर LPG असा एसएमएस पाठवून गॅस सिलिंडर बुक करू शकतात.

टीप: ही माहिती प्राथमिक स्वरूपाची असून संबंधित गॅस कंपनी किंवा अधिकृत एजन्सीकडून माहिती घेऊनच पुढील प्रक्रिया करावी.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??