क्राईम न्युज

पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न ; नागरिक संतप्त, संशयित ताब्यात…

पुणे : नसरापूर येथे अल्पवयीन चिमुकलीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच पुणे शहरात पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पर्वती पायथा परिसरातील जनता वसाहत येथे ९ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ मे २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी धाव घेतली. काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणी संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, आरोपीचे नाव आणि अधिकृत तपशील अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करत पोलिसांकडे जोरदार निवेदन केले.

घटनेची माहिती मिळताच पर्वती पोलिस स्टेशन चे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेचा पुढील तपास सुरू असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांकडून परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??