जिल्हासामाजिक

रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या दिव्यांग बांधवांना लायसन्स द्या; अतिक्रमण कारवाई नको ; जनाधार दिव्यांग ट्रस्टची मागणी

हडपसर (पुणे) : रस्त्यावर लहान-मोठा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या दिव्यांग बांधवांवर अतिक्रमण विभागाने कारवाई करू नये, त्याऐवजी त्यांना पथारी विभागाचे अधिकृत लायसन्स देऊन गरजूंना स्टॉल उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे.

या मागणीसंदर्भात ट्रस्टचे पदाधिकारी दत्तात्रेय ननवरे (अध्यक्ष), अभय पाटीलशशिकांत राऊत यांनी हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे सहाय्यक निरीक्षक अभिलेष कांबळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

दिव्यांग बांधवांना स्वतःच्या पायावर उभं राहून सन्मानाने जीवन जगता यावं, यासाठी शासन व प्रशासनाने सहानुभूती न दाखवता ठोस विश्वास द्यावा, अशी मागणी ट्रस्टतर्फे करण्यात आली.

सहानुभूती नको, विश्वास दाखवा,” असा संदेश यावेळी देण्यात आला.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??