कृषी व्यापारजिल्हासामाजिक

इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी वळली रेशीम शेतीकडे

डॉ गजानन टिंगरे 

इंदापूर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील म्हसोबाची वाडी हे गाव गेल्या काही वर्षांत पारंपरिक शेतीपासून रेशीम शेतीकडे यशस्वीरीत्या वळले असून, या प्रगत परिवर्तनाला अधिक गती देण्यासाठी व शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळावे यासाठी म्हसोबाच्यावाडीतच एकदिवसीय रेशीम उत्पादन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्राचे अध्यक्षस्थान रेशीम संचालनालयाचे उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे यांनी भूषविले. यावेळी प्रादेशिक रेशीम कार्यालयाच्या सहाय्यक संचालक डॉ. कविता देशपांडे तसेच जिल्हा रेशीम अधिकारी संजय फुले उपस्थित होते.

चर्चासत्रास म्हसोबावाडी आणि परिसरातील 46 शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रेशीम उत्पादक शेतकरी मनोज चांदगुडे यांनी या उद्योगाची सुरुवात दोन-तीन शेतकऱ्यांपासून झाली असून आज सव्वाशेहून अधिक शेतकरी रेशीम व्यवसायात कार्यरत असल्याची माहिती दिली. अजिंक्य चौकी सेंटरचे प्रोप्रायटर अजिंक्य कांबळे यांनी चॉकी सेंटरचे महत्त्व आणि कीटक संगोपनातील तांत्रिक बाबी सविस्तर स्पष्ट केल्या.

रेशीम उत्पादक आबासाहेब सांगळे यांनी तुती वृक्षवाढीसाठी गोमूत्र व सेंद्रिय खतांचा वापर फायदेशीर असल्याचे सांगितले, तर बारामती तालुक्यातील अतुल घाडगे यांनी कीटकसंगोपन गृहातील तापमान व आर्द्रता नियंत्रणासाठी एच.ओ. तंत्रज्ञान उपयुक्त ठरते, असे प्रतिपादन केले.

यावेळी डॉ. महेंद्र ढवळे यांनी तुती बाग व्यवस्थापन, खत नियोजन, चॉकी व प्रौढ कीटक संगोपन, रोग-कीड नियंत्रण तसेच कोश बाजारपेठ या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.

यानंतर डॉ. ढवळे यांनी म्हसोबावाडीतील रेशीम उत्पादक स्वप्निल चांदगुडे यांच्या तुती बागेची आणि कीटक संगोपन गृहाची पाहणी करून उझी माशी नियंत्रणाचे प्रात्यक्षिक दाखवले. रेशीम उद्योगाच्या प्रगतीसाठी गटशेती आणि पीकविमा योजना आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांनी चर्चेतून मत मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज चांदगुडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अण्णासाहेब चांदगुडे यांनी केले.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??