क्राईम न्युज

पूरपरिस्थितीस कारणीभूत ; शिक्षण सम्राटासह सहा जणांवर गुन्हा…

तुळशीराम घुसाळकर 

थेऊर (ता. हवेली) : थेऊर परिसरात झालेल्या अतिवृष्टीदरम्यान ओढे, नाले व मोऱ्या बुजवून नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण केल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यात शेतमाल, शेती व पशुधनाचे प्रचंड नुकसान झाले. या प्रकरणी शिक्षण सम्राट प्रसादराव पाटील यांच्यासह सहा जणांविरोधात महसूल विभागाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

ग्राम महसूल अधिकारी अर्जुन नागनाथ स्वामी (रा. वाघोली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रसादराव दत्ताजीराव पाटील, दिलीप कुंजीर, दत्तात्रय चव्हाण, सुषमा थोरात (सर्व रा. थेऊर) तसेच गोविंद उत्तमचंदानीराजेश उत्तमचंदानी (रा. लोहगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारीनुसार,

गट क्र. ६३ मधील क्षेत्रालगत प्रसादराव पाटील यांनी संरक्षण भिंत बांधल्याने ओढ्याचे पात्र अरुंद झाले.

गट क्र. १६३ व १६४ मध्ये दिलीप कुंजीर, दत्तात्रय चव्हाणसुषमा थोरात यांनी परवानगीशिवाय ओढा बुजवून अनधिकृत प्लॉटिंग केली.

गट क्र. ६६३ मध्ये गोविंदराजेश उत्तमचंदानी यांनी जमीन खरेदी करून ओढ्याचे पात्र बुजवून प्लॉटिंग केली.

या अतिक्रमणांमुळे रुकेवस्तीकांबळेवस्ती परिसरात पुराचे पाणी शिरून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. शेती, शेतमाल व जनावरांचे प्रचंड नुकसान झाले.

अपर तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या आदेशावरून अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??