क्राईम न्युज

धर्मांतरासाठी महिलेला आधी डांबून ठेवून, मग बलात्कार, पोलिसांकडून तिघेजण अटक..; विमानतळ पोलीस ठाणे..

पुणे : धर्मांतर करण्यासाठी एका ३२ वर्षीय महिलेला धमकावून तिला एका घरात डांबून ठेवण्यात आले. महिलेला धमकावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत एका ३२ वर्षीय पीडित महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, संतोष रामदास गायकवाड (वय ५५, रा. विठ्ठल मंदिरासमोर, धानोरी), सागर मधुकर लांडगे (वय ३०,रा. गल्ली क्रमांक ३, माधवनगर, धानोरी), तसेच एका महिलेला अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला ओळखीचे आहेत. आरोपींनी पीडित महिलेला धर्मांतर करण्यासाठी बळजबरी केली. तिला धानोरी परिसरात बोलवले. आरोपी महिलेच्या धानोरी येथील घरात संतोष गायकवाड आणि सागर लांडगे यांनी तिला डांबून ठेवले. यानंतर दोघांनीही पीडितेला पिस्तुलाचा धाक धाकवून जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपीने महिलेवर बलात्कार केला. या घटनेची मोबाइलर चित्रीकरण करुन समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी सागर लांडगे याने पीडित महिलेला लोहगाव परिसरात नेले. तेथे तिला एका खोलीत डांबून ठेवले. त्याने महिलेला धमकावून वेळोवेळी अत्याचार केले, असे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आरोपींविरुद्ध बलात्कार, बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. महिलेसह तिघांना अटक करण्यात आली असून, सहायक पोलिस निरीक्षक सचिन धामणे करत आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??