क्राईम न्युज

अपंग तरुणीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी जेरबंद ; पौड पोलिसांची धडाकेबाज कारवाई…

पौड, ता. ७ : मुळशी तालुक्यातील मांडवखडक (वेगरे) येथे १९ वर्षीय मतिमंद व अपंग तरुणीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला पौड पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत जेरबंद केले आहे. डोंगराळ भागात लपून बसलेल्या आरोपीचा शोध घेत पोलिसांनी लोणावळा ग्रामीण हद्दीतील पवनानगर येथून त्याला अटक केली.

गजानन भागू पवार (वय २६, रा. मांडवखडक वेगरे, ता. मुळशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ६४, ६४(१), ६४(२)(i)(k), ३५१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास पीडित तरुणी घरात एकटी असताना आरोपीने तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला. पीडित तरुणी मतिमंद व अपंग असल्याने या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत होता. याप्रकरणी १ मे रोजी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी तातडीने तपास पथके तयार केली. आरोपी हा कातकरी समाजातील असून डोंगराळ भागात सतत ठिकाण बदलत असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिसांनी आरोपीचे नातेवाईक, ओळखीची ठिकाणे तसेच तो मजुरीसाठी जात असलेल्या परिसरांची माहिती गोळा करत शोधमोहीम सुरू ठेवली.

दरम्यान, आरोपी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवनानगर परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर कदम, पोलीस हवालदार रॉकी देवकाते, सिद्धेश पाटील, जगदाळे, सुरवसे तसेच पोलीस शिपाई शिंदे यांच्या पथकाने खासगी वाहनातून पवनानगर येथे धाव घेत सापळा रचला. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

सदर आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पौड पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.

“महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये पोलीस प्रशासन अत्यंत संवेदनशील असून अशा गुन्ह्यांतील आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डोंगराळ भागात शोध घेऊन पथकाने आरोपीला जेरबंद केले,” अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी दिली.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??