जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

रामदरा डोंगर परिसरात भीषण वनवा ; वनखात्याच्या दुर्लक्षाचा स्थानिकांचा आरोप…

तुळशीराम घुसाळकर

लोणी काळभोर (ता. हवेली) : लोणी काळभोर परिसरातील तीर्थक्षेत्र रामदरा येथील वनविभागाच्या हद्दीतील डोंगरावर काल दुपारच्या सुमारास भीषण वनवा लागून लाखो झाडांसह असंख्य वन्यजीवांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर वनखात्याचे दुर्लक्ष असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
वनव्याची माहिती मिळताच ग्रीन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांच्यासह संस्थेचे कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोती व झाडांच्या फांद्यांच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीला जोरदार वाऱ्याची साथ मिळाल्याने आग झपाट्याने पसरत गेली आणि कार्यकर्त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.

या वनव्यामुळे डोंगर परिसरातील खैर, करवंद, कडुनिंब, चंदन, टंटणी तसेच विविध प्रजातींच्या बाभळींसह मोठ्या प्रमाणात झाडे जळून खाक झाली. याशिवाय या परिसरात आढळणारे मोर, ससा, हरीण, कोल्हा, लांडगा, तरस, सायाळ, मुंगूस, रानडुक्कर, साप तसेच असंख्य छोटे कीटक व सरपटणारे प्राणी यांनाही मोठा फटका बसल्याची माहिती स्थानिकांनी दिली. दरम्यान, ग्रीन फाउंडेशनच्या वतीने झाडांना पाणी देण्यासाठी टाकण्यात आलेली पाईपलाईनही या आगीत जळून खाक झाली आहे.

वनवा नैसर्गिकरीत्या लागला की कोणीतरी मुद्दाम लावला, याचा अद्याप तपास लागलेला नाही. मात्र, दरवर्षी उन्हाळ्यात या डोंगर परिसरात वनवे लागण्याच्या घटना घडत असल्याने वनविभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना का केल्या नाहीत, असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणीदरम्यान आग विझवण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकच झुंज देताना दिसत होते. वनखात्याचे अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी दिसून आले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वनखात्याकडून झाडे लावण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; मात्र तीच झाडे आगीत जळत असताना त्यांना वाचवण्यासाठी कोणतीही तातडीची यंत्रणा सक्रिय होत नसल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली.

दरवर्षी लागणाऱ्या या वनव्यामुळे पक्ष्यांची अंडी, प्राण्यांची पिल्ले नष्ट होतात आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. या गंभीर प्रकाराची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??