क्राईम न्युज

महिलांचे मंगळसूत्र चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद, गुन्हे शाखा युनिट–६, पुणे शहराची मोठी कामगिरी….

पुणे : कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास अभिवादनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा गैरफायदा घेत तसेच बसस्टॉप व इतर गजबजलेल्या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पुणे शहर गुन्हे शाखा युनिट–६ ने जेरबंद केले आहे. या कारवाईत तब्बल २० लाख ४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून ६ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पुणे शहरात महिलांच्या दागिन्यांच्या चोरीच्या घटनांना आळा घालण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आदेश प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट–६ कडील पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व पोलीस अंमलदार कारखेले, मुंडे, साळवे, ताकवणे, व्यवहारे यांच्या पथकाने सातत्याने गोपनीय माहिती संकलित करून संशयित आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवले.

दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे पथकाने कारवाई करत सुभाष चंद्रकांत जाधव (वय ३९, रा. शिरापूर धुमाळ, ता. शिरूर, जि. बीड / कालिकानगर, जि. बीड) आणि लहु संतराम गायकवाड (वय ३०, रा. रायमोह, ता. शिरूर, जि. बीड) या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता एकूण १६७ ग्रॅम वजनाचे, अंदाजे २०,०४,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

या आरोपींकडून पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले खालील गुन्हे उघडकीस आले आहेत. वाघोली पोलीस ठाणे (गु.रं.नं. 500/2025), लोणीकंद पोलीस ठाणे (गु.रं.नं. 06/2025 व 07/2025), लोणी काळभोर पोलीस ठाणे (गु.रं.नं. 306/2025), हडपसर पोलीस ठाणे (गु.रं.नं. 1307/2024) व स्वारगेट पोलीस ठाणे (गु.रं.नं. 182/2025) येथील गुन्हे असून सर्व गुन्हे भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत दाखल आहेत.

ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शाखा युनिट–६ कडील पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे तसेच पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, बाळासाहेब सकटे, विनायक साळवे, सारंग दळे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, नितीन धाडगे, सोनाली नरवडेप्रतिक्षा पानसरे यांनी ही कारवाई केली.

या कारवाईमुळे पुणे शहरातील महिलांच्या मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यांवर मोठ्या प्रमाणात आळा बसणार असून पुढील तपास सुरू आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??