जिल्हासामाजिक

जनतेच्या सेवकांचा सन्मान ; भाजपाकडून दीपावली निमित्त ‘दिवे’ भेट देऊन गौरव…

लोणी काळभोर (ता. हवेली) : जनतेच्या हितासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाभावाचा सन्मान करण्याच्या हेतूने भारतीय जनता पक्षाच्या वतीने दीपावलीच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर परिसरातील विविध सरकारी आस्थापनांमध्ये ‘दिवे’ भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

ही भेट नामदार चंद्रकांत पाटील (उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, संसदीय कार्यमंत्री, पालकमंत्री सांगली व आमदार कोथरूड विधानसभा मतदारसंघ) तसेच भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश व भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या वतीने देण्यात आली.

भाजपाच्या या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत लोणी काळभोर येथील सर्व कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (एमएसईबी) चे अधिकारी व कर्मचारी, पाटबंधारे विभाग लोणी काळभोर, तहसील कार्यालय हवेली लोणी काळभोर, तसेच वन विभाग लोणी काळभोर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावली निमित्त ‘दिवे’ भेट देण्यात आले.

या उपक्रमाचा उद्देश म्हणजे दिवाळी या हिंदू परंपरेतील उजेडाच्या आणि आनंदाच्या सणाद्वारे समाजात सेवा देणाऱ्या शासकीय यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा होता.
या भेटीद्वारे भारतीय जनता पक्षाने या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करत “अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या सेवकांचा सन्मान” अशी भावना व्यक्त केली.

या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी हवेली मंडळाचे अध्यक्ष गणेश चौधरी, सरचिटणीस कमलेश काळभोर, उपाध्यक्ष पैलवान मनोज काळभोरनामदेव जवळकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष तानाजी आप्पा काळभोर, उद्योग आघाडी अध्यक्ष नबाजी रुपनर, उद्योग आघाडी उपाध्यक्ष विनायक बळप, व्यापारी आघाडी उपाध्यक्ष सतीश खंडेलवाल, सोशल मीडिया अध्यक्ष प्रशांत भोंडवे, कामगार आघाडी अध्यक्ष विशाल काळभोर, तसेच प्रगतशील बागायतदार प्रशांत वसंत काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी उपस्थित असलेल्या व स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केला. असे सरचिटणीस हवेली भाजपाचे कमलेश काळभोर यांनी सांगितले की,

“जनतेच्या हितासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. समाजात सेवाभाव टिकवून ठेवणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.”

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??