जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

महसूल विभागात खळबळ, सातबारा दुरुस्तीचं प्रकरण भोवलं ; मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले निलंबित…

पुणे : सातबारा दुरुस्ती करताना ८५ वर्षांपेक्षा आधिकचा विलंब याबाबत विचार न करता अनियमितता केल्याने मुळशीचे (पुणे जिल्हा) तहसीलदार रणजीत भोसले यांना निलंबित करत शासनाने दणका दिला आहे. (१६ जून) रोजी शासनाचे अपर सचिव प्रविण पाटील यांनी त्यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

मुळशीचे तहसीलदार यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायदा 1966 चे कलम 149,150 व 155 चांगलेच भोवले आहे. एका सातबारावर “दि टाटा पॉवर कंपनी लि.” या कंपनीचे नाव कमी करुन “श्री. धोंडू गोपाल ढोरे यांचे नाव दाखल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याविषयी तहसीलदार भोसले यांनी मालकी हक्कामध्ये नाव दाखल करण्याचा आदेश केला होता.

दरम्यान, प्रस्तुत प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या रिट याचिकान्वये न्यायालयाने तहसीलदार यांनी पारित केलेला आदेश रद्द केला आहे. त्यामुळे तहसीलदार मुळशी यांनी पारित केलेल्या निर्णयाची अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांचे स्तरावर चौकशी करण्यात आली. अतिरिक्त विभागीय आयुक्त यांनी मुळशीचे तहसीलदार भोसले यांचेकडून अनियमितता झाल्याचा अहवाल शासनास सादर केला होता.

अशाप्रकारे शासकीय कर्तव्य पार पाडताना गुणवत्ता व औचित्य न ठेवल्याने कर्तव्यात कसूरी करुन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन केले असल्याने तहसीलदार रणजित भोसले यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील तरतुदी अन्वये विभागीय चौकशीची कारवाई करण्याचे प्रस्तावित केले आहे.

त्यानुसार, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ च्या नियम ४ (१) (अ) अन्वये मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले यांना शासन सेवेतून निलंबित केले आहे.

मुख्य संपादक सुनिल थोरात 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??