क्राईम न्युजजिल्हामहाराष्ट्र

आधी अपहरण, वाटेत तिला मारहाण करुन जखमी केले. जीवे ठार मारण्याची धमकी, घटनास्थळावरून फिर्यादी निसटली, हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; पोलीस उपनिरीक्षक गेंड यांच्या कडे तपास…

पुणे (हडपसर) : फिर्यादी परीक्षेच्या अभ्यासात असल्याने प्रियकराला फार काही भेटणे झाले नाही. फोनवर हु बोलणे टाळत होत्या. तेव्हा प्रज्वलने फोनवर त्याच्याकडील अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.

रविवारी हा प्रियकर पुण्यात आला, त्याने या तरुणीला शिवीगाळ करुन जबरदस्तीने थार गाडीत बसविले. तिचे अपहरण करुन तिला चाकणच्या दिशेने घेऊन गेला. वाटेत तिला मारहाण करुन जखमी केले. तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

हडपसर पोलिसांनी तात्काळ या प्रियकराला अटक केली आहे.

प्रज्वल कैलास मोहिते (वय २७, रा. मोहितेवाडी, शेल पिंपळगाव, चाकण) असे या प्रियकराचे नाव आहे. याबाबत एका २६ वर्षाच्या तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार रविवारी दुपारी दीड वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मुळच्या नाशिक येथील राहणार्‍या आहेत. पुण्यात त्या शिक्षणासाठी आल्या़ असून सध्या मांजरी येथे भाड्याने रहात आहेत. त्यांची प्रज्वल मोहिते याच्याशी २०२१ पासून ओळख असून त्यांचे प्रेमसंबंध आहेत. प्रज्वल याचा व्यवसाय आहे. परिक्षा जवळ आल्याने फिर्यादी या अभ्यास करत असतात. त्यामुळे त्यांचे प्रज्वल याच्याशी भेटणे झाले नाही़ तसेच त्यांनी फोनवर बोलणे टाळत होत्या. दरम्यानच्या काळात प्रज्वल याने त्यांना फोनवर त्यांच्याकडे असलेले फिर्यादी यांचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असे. रविवारी तो त्या रहात असलेल्या घरी आला.

तिच्याशी भांडण करु लागला. तिचे केस ओढून हाताने मारहाण केली. शिवीगाळ करुन जबरदस्तीने महिन्द्रा थार गाडीत चालकाजवळ बसविले. चालकाला चाकणच्या दिशेने गाडी घेण्यास लावली. चालकाच्या शिटजवळ पडलेली तुटलेली टोकदार प्लॅस्टिक पट्टीने त्याने या तरुणीला खांद्यावर, हातावर, मनगटावर, दोन्ही पायांच्या पोटरीवर मांडीवर मारहाण करुन जखमी केले. डोक्यावर बुक्की मारुन जखमी केले. तसेच शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांचे भांडण मिटले. तेव्हा प्रज्वल मोहिते याने तिला चाकण येथील श्वास रुग्णालयात नेऊन तिच्यावर उपचार केले. त्यानंतर रात्री उशिरा पुण्यात आल्यावर या तरुणीने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने प्रज्वल मोहिते याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गेंड तपास करीत आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??