महाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, या महिन्यात होणार निवडणूक,..वाचा सविस्तर…

संपादक श्री सुनिल थोरात

मुंबई : महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार पुनरागमन केलं, राज्यात तब्बल २३२ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीला मात्र अवघ्या ५० जागांवरच समाधान मानावं लागलं. पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आलं.

आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे

मधल्या काळात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काय होणार? कोण बाजी मारणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीमधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात राज्यात जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील, दीड महिन्यात या सगळ्याच निवडणुका उरकल्या जातील. जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणूक एकत्र होईल, त्यामुळे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने ताकतीने काम करा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केलं आहे, ते सांगलीमध्ये आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांचं सरकार जेव्हा महाराष्ट्रात आलं होतं. तेव्हा महाराष्ट्रातील संगळीच कामं थांबली होती, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेचं महाराष्ट्राच्या विकासासाठी यापुढे संस्थात्मक बदल करणं गरजेचं आहे, असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन इमारतीचं लोकार्पण व विविध विकासकामांचं उद्घाटन देखील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. कडेगाव आणि आटपाडी पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचं देखील उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न झालं. यावेळी सांगली पोलीस दलाला मिळालेल्या नवीन १९ वाहनांचं देखील लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार विश्वजित कदम यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??