राजकीय

तीन टप्प्यासाठी आर्थिक निविदा खुल्या : वर्तुळाकार रस्ता प्रकल्प पुणे..

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम १२ टप्प्यांत होणार असून यापूर्वी नऊ टप्प्यांतील कामासाठी निविदा अंतिम करून कंत्राट बहाल करण्यात आली.

        आता उर्वरित तीन टप्प्यांतील कामासाठीच्या आर्थिक निविदा सोमवारी खुल्या करण्यात आल्या. त्यानुसार दोन टप्प्यासाठी अफकाॅन इन्फ्रास्ट्रक्चरकडून तर एका टप्प्यासाठी जीआर इन्फ्राप्रोजेक्टकडून सर्वात कमी बोली लावण्यात आली आहे. त्यामुळे या दोन कंपन्यांना कंत्राट मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार लवकरच कंत्राट अंतिम केले जाणार आहे.

         एमएसआरडीसी १२६ किमी लांबीच्या पुणे वर्तुळाकार रस्त्याचे काम हाती घेणार आहे. येत्या काही दिवसातच या प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाणार आहे. या प्रकल्पातील नऊ टप्प्यांतील कामाचे कंत्राट बहाल करून पात्र कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले आहेत. भूसंपादनही अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पाला आणखी वेग देण्यासाठी उर्वरित तीन टप्प्यांतील निविदा प्रक्रिया अंतिम करण्याच्या कामालाही वेग देण्यात आला आहे. १२ पैकी तीन टप्प्यांची निविदा प्रक्रिया काही कारणाने उशीराने सुरू झाली असून सोमवारी तीन टप्प्यांसाठीच्या आर्थिक निविदा खुल्या करण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

         वलाटी, हवेली ते सोनेरी, पुरंदर या ई ५ टप्प्यासाठी अफकाॅन आणि नवयुगा इंजिनीअरिंग कंपनीकडून आर्थिक निविदा सादर करण्यात आल्या होत्या. तर सोनोरी ते गराडे, पुरंदर या ई ६ टप्प्यासाठी जीआर इन्फ्राप्रोजेक्ट, पटेल इन्फ्रास्ट्रक्चर, पीएनसी इन्फ्राटेकसह अन्य एका कंपनीने आर्थिक निविदा सादर केली आहे. त्याच वेळी गराडे, पुरंदर ते शिवरे, भोर या ई ७ टप्प्यासाठी नवयुगा अफकाॅनने निविदा सादर केल्या आहेत. त्यानुसार ई ५ आणि ७ टप्प्यासाठी सर्वात कमी बोली अफकाॅनकडून तर ई ६ टप्प्यासाठी जीआर इन्फ्राप्रोजेक्टकडून लावण्यात आली आहे. त्यामुळे अफकाॅनला दोन टप्प्याचे तर जीआर इन्फ्राप्रोजेक्टला एका टप्प्याचे काम मिळण्याची शक्यता आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??