जिल्हासामाजिक

अकोला आयडॉल पर्व ४ : स्वरांचा महोत्सव, प्रतिभेचा गौरव आणि संस्कृतीचा उत्सव…

किर्ती बोंगार्डे

अकोला : युवा विचारपीठ व श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अकोला आयडॉल पर्व ४ चा भव्यदिव्य ग्रॅण्ड फिनाले अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध नियोजनात आणि रसिकांच्या प्रचंड प्रतिसादात पार पडला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या सुमारे ४०० स्पर्धकांनी या महागायन स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. तीन आठवड्यांच्या चुरशीच्या आणि कसोटीच्या प्रवासानंतर अंतिम फेरीत निवड झालेल्या ३५ गुणी स्पर्धकांनी आपल्या सुमधुर गायनकलेने उपस्थित रसिक, परीक्षक आणि मान्यवरांची मने जिंकली.

ग्रॅण्ड फिनालेच्या रंगमंचावर गायनाच्या विविध शैली, राग-तालांचे सौंदर्य आणि भावनांचा उत्कट आविष्कार अनुभवायला मिळाला. प्रत्येक स्पर्धकाच्या सादरीकरणातून त्यांची सातत्यपूर्ण साधना, कठोर मेहनत आणि कलात्मक परिपक्वता प्रकर्षाने दिसून आली. शास्त्रीय, सुगम, भावगीत तसेच आधुनिक संगीताच्या सुरेल सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले होते.

स्पर्धेच्या निकालात अ गटामध्ये कु. श्रीमई चिंचोळकर हिने उत्कृष्ट गायन सादरीकरणाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावत अकोला आयडॉल पर्व ४ ची मानाची विजेती ठरण्याचा बहुमान मिळवला. द्वितीय क्रमांक कु. शरयू वाघ हिने, तर तृतीय क्रमांक चि. अथर्व नागरगोजे याने मिळवला. याच गटात चैतन्य देशमुखप्रेम तेलंग यांना प्रोत्साहन बक्षिसाने गौरविण्यात आले. ब गटामध्ये कु. भाग्यश्री खानोदे हिने प्रथम क्रमांक मिळवत परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. द्वितीय क्रमांक कु. तेजस्विनी खोदतकर, तर तृतीय क्रमांक मलंग शहा याने पटकावला. अंकित कैथवासअनमोल शर्मा यांना प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले. क गटात राजन कारंजकर यांनी प्रथम क्रमांकाचा मान मिळवला, तर द्वितीय क्रमांक नयना पोहेकार आणि तृतीय क्रमांक वामन जवंजाळ यांनी मिळवला. पल्लवी कावडेमुकुल तिवारी यांना प्रोत्साहन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या भव्य सोहळ्याच्या निमित्ताने संगीत क्षेत्रातील दिग्गजांचा यथोचित गौरवही करण्यात आला. युवा विचारपीठ आयोजित उद्योगरत्न स्व. कालुरामजी रुहाटिया अकोला आयडॉल संगीत गौरव पुरस्कार प्रा. डॉ. किशोर देशमुख यांना प्रदान करण्यात आला. तसेच गाणचक्षू स्व. रामकृष्णजी कोल्हाळे स्मृती अकोला आयडॉल संगीत साधक पुरस्कार प्रा. डॉ. नीरज लांडे यांना देऊन त्यांच्या प्रदीर्घ आणि निष्ठावान संगीत साधनेचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला संगीत, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. मुख्य प्रायोजक संजयजी रुहाटिया (संचालक, विठ्ठल ऑइल), प्राचार्य डॉ. रामेश्वरजी भिसे, समाजसेवक प्रा. डॉ. संतोष हुशे, निलेशबाप्पु देशमुख, डॉ. प्रवीण अग्रवाल, मंगेश कराळे, मनोज भालेराव, डॉ. हर्षवर्धन मानकर, डॉ. संजय तिडके, हास्यकवी किशोर बळी, निमंत्रित गायक प्रसाद उलांडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या संपूर्ण महागायन स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामागे युवा विचारपीठाचे अध्यक्ष व मुख्य आयोजक प्रा. निलेश ढाकरे, उपाध्यक्ष व संयोजिका स्मिता अग्रवाल, मुख्य समन्वयक राजेश अग्रवाल, कार्यकारी समन्वयक कौशिक पाठक यांच्यासह गिरीधर भोंडे, डॉ. नितीन देशमुख, ऍड. शेषराव गव्हाळे, प्रा. गणेश पोटे, प्रा. कोमल चिमणकर, अश्विनी ढोरे, डॉ. तृप्ती भाटिया, मेघा देशपांडे, काजल वासरानी, पल्लवी पाठक, रीमा ढाकरे, सपना गव्हाळे, कु. सुरभी दोडके आदींचे अथक परिश्रम, काटेकोर नियोजन आणि संघभावना कारणीभूत ठरली.

अकोला आयडॉल पर्व ४ हा केवळ गायन स्पर्धा न राहता नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देणारा, संगीत साधनेचा सन्मान करणारा आणि मराठी सांस्कृतिक परंपरेचा गौरव करणारा एक प्रेरणादायी आणि संस्मरणीय महोत्सव ठरला.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??