जिल्हासामाजिक

जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत संविधान दिन उत्साहात साजरा…

हडपसर (पुणे) : २६ नोव्हेंबर
जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी भारतीय संविधानातील प्रस्तावना एकत्र वाचून संविधानाप्रती निष्ठा व्यक्त केली.

हमारा संविधान–हमारा स्वाभिमान’ कॅम्पेन अंतर्गत संविधान अमृत महोत्सवी जनजागृती अभियानात विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभाग नोंदवला. प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर यांनी मार्गदर्शन करताना संविधानाची निर्मिती, मूलभूत अधिकार–कर्तव्ये आणि लोकशाही मूल्यांचे महत्त्व स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांनी “भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये”, “डॉ. आंबेडकरांचे योगदान” आणि “लोकशाहीतील युवकांची भूमिका” या विषयांवर भाषण, पोस्टर प्रेझेंटेशन व निबंध सादर केले. संविधान जनजागृती रॅली, घटनादुरुस्ती माहिती सादरीकरण आणि शपथविधी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

जनजागृती अभियानातील उद्दिष्टे, कामकाज आणि यशाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाला जेएसपीएम हडपसर शैक्षणिक संकुल संचालक डॉ. व्ही. ए. बुगडेडॉ. मारुती काळबांडे उपस्थित होते. प्रा. रविराज जाधव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

प्रा. ए. एम. पाटील, एस. डी. गाडेकर, एन. एस. कोलते, पी. ए. लगदिवे, सी. सी. ममडगे, टी. एस. काशीद तसेच कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. उपस्थितांनी संविधान मूल्ये जीवनात पाळण्याची प्रतिज्ञा केली. प्रा. स्वप्निल गाडेकर यांनी आभार प्रदर्शन केले आणि राष्ट्रगीताने समारोप झाला.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??