जिल्हासामाजिक

लोणी स्टेशन येथील सेंट टेरेसा स्कूलजवळ वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळला ; अटॅक आल्याने मृत्यू

कदमवाकवस्ती : लोणी स्टेशन परिसरातील सेंट टेरेसा शाळेजवळ एका ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह आढळून आल्याने शनिवारी (दि. २०) सकाळी परिसरात खळबळ उडाली. ही घटना सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

मधुकर विठ्ठल गिरिगोसावी (वय ६९, रा. श्री राम मंदीर, लोणी काळभोर, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. सकाळच्या सुमारास नागरिकांना शाळेजवळील मोकळ्या जागेत एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती तात्काळ लोणी काळभोर पोलिसांना देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार तुळशीदास जाधवमहेंद्र आगळे घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलीस हवालदार वैशाली नागवडे यांनी संबंधित व्यक्तीस उपचारासाठी विश्वराज रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हृदयविकाराचा तीव्र झटका (अटॅक) आल्याने मृत्यू झाल्याचे घोषित केले.

सूत्रांच्या माहितीनुसार मधुकर गिरिगोसावी यांच्यावर यापूर्वी दवाखान्यात उपचार सुरू होते. रात्री गारठ्याचा त्रास वाढल्याने ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेची नोंद लोणी काळभोर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. असे पोलीस हवालदार वैशाली नागवडे यांनी सांगितले.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??