आरोग्यकृषी व्यापारजिल्हामहाराष्ट्रशिक्षणसामाजिक

पाणी संवर्धन ही काळाची गरज; जेएसपीएमच्या जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत जनजागृती उपक्रम…

हडपसर (पुणे) : वाढती लोकसंख्या, अनियमित पर्जन्यमान आणि भूजल पातळीतील घट यामुळे भविष्यातील पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये पाणी संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जेएसपीएमच्या जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, हडपसर येथे दि. २५ जुलै २०२६ रोजी ‘पाणी संवर्धन उपक्रम‘ उत्साहात राबविण्यात आला.

या उपक्रमाला संकुल संचालक डॉ. वसंत बुगडे, डॉ. मारुती काळबांडे तसेच डिप्लोमा फार्मसीचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य असल्याचे सांगत, पाणी वाचविणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले.

उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना महाविद्यालय परिसरात राबविण्यात येणाऱ्या विविध पाणी संवर्धन प्रक्रियांची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. पर्जन्यजल संधारण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) प्रणालीचे कार्य, त्यामागील वैज्ञानिक संकल्पना तसेच पावसाचे पाणी साठवून त्याचा भूजल पुनर्भरणासाठी आणि विविध उपयोगांसाठी कसा प्रभावी वापर करता येतो, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी पाणी संवर्धन ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित करत विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. घर, शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी पाण्याची नासाडी टाळण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही सांगण्यात आले. भविष्यातील पिढ्यांसाठी पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी पर्जन्यजल संधारणासारख्या उपाययोजनांचा व्यापक अवलंब करणे अत्यावश्यक असल्याचे मान्यवरांनी स्पष्ट केले.

याशिवाय विद्यार्थ्यांनी विविध परिसरांना भेटी देऊन नागरिकांमध्ये पाणी संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्याचा संदेश दिला. पाण्याच्या योग्य वापराबाबत जनजागृती करून पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहनही करण्यात आले.

या उपक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन करण्यासाठी प्रा. निकिता कोलते यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच डॉ. रविराज जाधव, प्रा. अनुराधा पाटील, प्रा. स्वप्नील गाडेकर, प्रा. प्रगती लगदिवे, प्रा. चेतन मामडगे, स्वप्नाली सावंत, प्रियांका महाजन, विवेक थोरात, स्वाती माकोने, रुपाली शिंदे, प्रतीक्षा थोरात, ऋतुजा दाते, पांडुरंग पवार, आकांक्षा जाधव आणि ज्योती रणधिरे यांनी उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मोलाचे सहकार्य केले.

महाविद्यालयाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पाणी संवर्धनाबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला असून, जलसंधारणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??