जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीत शिवजयंती उत्साहात व भक्तिभावाने साजरी…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : कदमवाकवस्ती ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली. सकाळी ग्रामपंचायत कार्यालय परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विधीवत पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी “छत्रपती शिवाजी महाराज की जय”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदू पाटील काळभोर होते. तर उपसरपंच नासीर पठाण, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना मान्यवरांनी शिवरायांचे कार्य, पराक्रम, शौर्य आणि स्वराज्य स्थापनेतील दूरदृष्टी यांचा गौरव केला. “छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव, न्यायप्रियता आणि स्त्री-सुरक्षेचा आदर्श घालून दिला. त्यांच्या विचारांवर चालणे हीच खरी शिवजयंती साजरी करण्याची पद्धत आहे,” असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. शेवटी उपस्थितांनी शिवरायांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??