जिल्हादेश विदेशमहाराष्ट्रसामाजिक

परंपरा, ताकद आणि थरार; लोणी काळभोरचा आखाडा ठरला सुपरहिट!

६१ कुस्त्या, लाखोंची बक्षिसे; लोणी काळभोरचा आखाडा ठरला मानाचा!

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : परंपरा, ताकद आणि थरार यांचा संगम अनुभवायला मिळाला तो लोणी काळभोर येथील श्रीमंत अंबरनाथ यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या भव्य कुस्ती आखाड्यात. नामांकित पैलवानांची उपस्थिती, लाखोंची बक्षिसे आणि हजारो कुस्तीप्रेमींची उस्फूर्त गर्दी यामुळे यंदाचा आखाडा अक्षरशः ऐतिहासिक ठरला.

गुरुवार (दि. २ एप्रिल) आणि शुक्रवार (दि. ३ एप्रिल) रोजी पार पडलेल्या यात्रेच्या निमित्ताने शुक्रवारी दुपारनंतर कुस्ती स्पर्धांना सुरुवात झाली. ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाच्या पारंपरिक मिरवणुकीनंतर जल्लोषात आखाड्याचे उद्घाटन झाले. सुरुवातीला छोट्या कुस्त्यांनी रंगत आणत वातावरण तापवले, तर त्यानंतर झालेल्या तब्बल ६१ निकाली कुस्त्यांनी प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले.

या महासंग्रामातील सर्वात चर्चेची ठरलेली अंतिम कुस्ती २ लाख २१ हजार रुपयांच्या बक्षिसासाठी झाली. महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेख आणि महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झालेली ही लढत अत्यंत चुरशीची ठरली. दोन्ही मल्लांनी ताकदीचे आणि कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रेक्षकांची दाद मिळवली. अखेर ही झुंज इतकी समसमान झाली की निकाल बरोबरीत जाहीर करण्यात आला.

दुसऱ्या क्रमांकाच्या २ लाख रुपयांच्या कुस्तीत हिंदकेसरी विक्रांत कुमार यांनी दीपक हुडा यांचा पराभव करत आपली ताकद सिद्ध केली. तिसऱ्या क्रमांकाच्या दीड लाख रुपयांच्या कुस्तीत महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांनी हरियाणाच्या जसपाल सिंगला चित्तपट केले. तर चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचा जयदीप पाटील यांनी सैन्यदलाच्या अमित कुमारला नमवून प्रेक्षकांची जोरदार दाद मिळवली.

महिला कुस्तीने वेधले विशेष लक्ष :

या भव्य आखाड्यात महिला कुस्तीनेही विशेष आकर्षण ठरवले. बहुली (ता. हवेली) येथील १७ वर्षीय संस्कृती गायकवाड (अजिंक्य तारा रामभाऊ सासवडे तालीम) दिल्ली येथील छत्रसाल स्टेडियममध्ये १७ वर्षाखालील गटात ब्राँझ पदक विजेती मानसी बोरकर हिच्याविरुद्ध दमदार लढत दिली. या अत्यंत चुरशीच्या सामन्यात संस्कृती गायकवाड हिने विजय मिळवत आपली क्षमता सिद्ध केली. या आखाड्यातील ही एकमेव महिला कुस्ती ठरली आणि प्रेक्षकांनीही तिला उत्स्फूर्त दाद दिली.

या जंगी आखाड्यात एकूण सुमारे ३० लाख रुपयांची रोख बक्षिसे विजेत्या मल्लांना देण्यात आली. विशेष म्हणजे, तब्बल दोन कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या आधुनिक आखाड्यात प्रेक्षकांसाठी तीन डिजिटल स्क्रीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येक कुस्तीचा थरार अधिक स्पष्टपणे अनुभवता आला.

याशिवाय, मोफत पिण्याच्या पाण्याची उत्कृष्ट व्यवस्था, बसण्याची सुटसुटीत सोय आणि यूट्यूबवरून थेट प्रक्षेपण यामुळे प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन माध्यमातूनही हजारो प्रेक्षकांनी कुस्त्यांचा आनंद घेतला. परिसरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असतानाही आखाड्याच्या वेळेत पाऊस न पडल्याने कार्यक्रम निर्विघ्न पार पडला. सायंकाळी ४ वाजता सुरू झालेला हा थरार रात्री साडेदहापर्यंत रंगत राहिला.

या भव्य आयोजनासाठी २००१ सालचे महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर, बाजार समिती संचालक प्रशांत काळभोर, लोणी काळभोर प्रशासक सरपंच नागेश काळभोर, तसेच सनी काळभोर, भरत काळभोर, नंदू पाटील काळभोर, राजेंद्र काळभोर, युवराज काळभोर, योगेश काळभोर, सुशील महाराज काळभोर, विशाल गुजर, गणेश कांबळे, कमलेश काळभोर यांच्यासह काळभैरवनाथ-अंबरनाथ देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोठे परिश्रम घेतले.

राज्यभरातून आलेल्या नामांकित मल्लांनी आणि कुस्तीप्रेमींनी या भव्य आयोजनाचे कौतुक करत लोणी काळभोरच्या आखाड्याला यंदा विशेष मानाचा तुरा मिळाल्याची भावना व्यक्त केली.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??