राजकीय

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे वेध; प्रस्थापितांचे जुन्या व नव्या गटानुसार आखणी करण्यास व्यस्त..

सुनिल थोरात (हवेली)

पुणे : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आटोपत नाही तोपर्यंत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे वारे चालू झाले.
            जिल्ह्यासह हवेली गावागावांमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे चांगले वेध लागले आहेत. आमदारकीचे आधीची पूर्व परिक्षा राजकीय ताकद दाखवणारी गावा भावाच्या राजकीय डावपेचातुन रंगाची निवडणूक म्हणून पाहिले जाते. त्या अनुषंगाने सर्वत्र पक्षाचे नेते कार्यकर्ते यांच्यात शह काटशहाचे अंदाज वर्तवीले जाऊ लागले.
          जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका कधी होणार? हे अद्याप स्पष्ट नसले, तरी स्थानिक नेते, कार्यकर्ते यांच्यात चर्चा रंगू लागली.
           महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत आपापल्या पक्षाचे निष्ठेने काम केल्याचा मोबदला म्हणून अनेक कार्यकर्त्यांना आता झेडपी व पंचायत समिती सदस्य होण्याचे स्वप्न पडू लागले आहे. राज्यातील एकूणच राजकीय वातावरण पाहता लवकरच घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे जाणकार म्हणतात. त्यासाठी इच्छुक आतापासूनच गुडग्याला बाशिंग बांधून तयार आहेत.
           हवेली तालुक्यातील २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्याचा मोठा फटका तालुक्याला बसला आहे. त्यामुळे येणारी निवडणूक ही किती गटात होणार याचे गणित महायुती सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे. महायुती व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जुन्या गटांनुसार अंदाज बांधून नवीन गट रचनेनुसार आपले ‘स्थानिक’चे राजकीय फासे फेकताना दिसत आहेत. लोकसंख्येच्या निकषानुसार, जिल्हा परिषद सर्कल व पंचायत समिती गण वाढणार की कमी होणार?
           जुन्या का नव्या गटानुसार ठरणार..
             महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा परिषदेसाठी ८२, तर पंचायत समित्यांसाठी एकूण १६४ गण निश्चित केले होते. यामुळे जिल्हा परिषदेचे नवीन ७ गट आणि पंचायत समित्यांचे नवीन १४ गण वाढले होते. हवेली तालुक्यातील तब्बल ७ गट आणि १४ गणांवर संक्रांत आली होती. नवीन रचनेत हवेली तालुक्यात आता केवळ ६ गट आणि १२ गण निश्चित झाले
             कोणाला बसणार फटका
अडीच वर्षांपासून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या असून सध्या प्रशासकराज सुरु आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातील अगोदर असलेल्या सदस्यांचे राजकीय वजन कमी झाले. तेथील राजकीय समीकरणे देखील बदलून गेल्यामुळे प्रस्थापितांना पुन्हा नव्याने तेथे जम बसविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.
       राजकीय पक्षांची तारेवरची कसरत..
           २०२२ मध्ये शिवसेना व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले. त्यानुसार जिल्ह्यासह, तालुक्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची दोन गटांत विभागणी होऊन कार्यकर्ते विभागले गेले आहेत. अडीच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्याने समीकरणे बदलली आहेत. सोबतच प्रत्येक पक्षांची मतपेढी देखील बदललेली असल्याने सर्वच राजकीय पक्षांचा या निवडणुकीत कस लागणार यात शंका नाही.
            या निवडणुकीत कोणाला तिकीट मिळणार, कोणाचे तिकीट कापणार, कोण पक्ष बदलणार, मतदार कोणावर विश्वास ठेवणार हा येणारा काळ ठरवेल ….
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??