क्राईम न्युज

मुंबईतील तरुणी पुण्यात सामूहिक बलात्कार; मैत्रिणीने घरी बोलावून केला घात.

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल..

पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.

या प्रकरणी पोलिसांनी पीडित तरुणाच्या एका मैत्रिणीसह दोन जणांना अटक केली आहे. तर, अन्य दोन जणांचा शोध सुरू आहे. ही घटना शुक्रवारी (३ जानेवारी २०२४) घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत रोहिदास गव्हाणे (वय, २८) आणि सुमोना भरत गव्हाणे उर्फ ​​सुमोना नूर इस्लाम शेख (वय, २४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही पुण्यातील सिंहगड रोड येथील वडगाव येथील रहिवासी आहेत. पीडित तरुणी मुंबईतील रहिवासी असून आरोपी सुमोना तिची मैत्रिण आहे. दरम्यान, शुक्रवारी सुमोनाने पीडिताला नवले पुलाजवळील आपल्या राहत्या घरी बोलावून घेतले. तिन्ही आरोपी तिच्या घरी आधीच होते. पीडिता सुमोनाच्या घरी पोहोचल्यानंतर आरोपींनी तिच्यावर एकामागून एक लैंगिक अत्याचार केले. पीडिताने विरोध केला असता आरोपींनी तिला ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पीडिताने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

                   दोन संशयितांचा शोध सुरू

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार,’पीडित तरुणी आणि आरोपी सुमोना मैत्रीणी आहेत. आरोपी सुमोनाने पीडिताला राहण्यासाठी घरी बोलावले. पीडिता सुमोनाच्या घरी गेल्यानंतर तिथे आधीच असलेल्या तीन जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी सुमोना आणि एक आरोपी रोहिदासला अटक केली आहे तर इतर दोन संशयितांचा शोध सुरू आहे.’

        महिलेसह चौघांविरोधात गुन्हा दाखल

‘पीडित तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणातील इतर दोघांनाही लवकरच अटक केली जाईल. या प्रकरणातील आरोपीं विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३७६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे’, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांनी दिली.

पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

👉🏻”द पाॅईंट न्युज 24″- https://vedhjanshakticha.in/
👉🏻फेसबुक – https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL
👉🏻ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08
👉🏻इन्स्टाग्राम – https://www.instagram.com
👉🏻डेलीहंट पेज – https://profile.dailyhunt.in/sunil24
👉🏻वाॅटसअप ग्रुपला अॅड होण्यासाठी – https://chat.whatsapp.com/I0myiS3d1MdAeEEQOkbyRj लिंकवर क्लिक करून ग्रुपला जाॅईन व्हा.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??