शिक्षण

विद्यार्थ्यांनी सर्वांच्या सहभागाने सामाजिक कार्य उंचवावे ; डॉ. महादेव वाळुंज..

डॉ गजानन टिंगरे

पुणे (इंदापुर) : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना व कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय भिगवन आणि श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने बिजवडी ता. इंदापूर येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे दि. २४ जानेवारी ते ३० जानेवारी आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भिगवन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज यांनी वरील मत व्यक्त केले.

युथ फॉर डिजिटल भारत , युथ फॉर डिजिटल लिटरसी हा उद्देश घेऊन शिबिरात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. २६ जानेवारी रोजी मुंबई येथे राष्ट्रीय सेवा योजना आरडी परेडसाठी भिगवन महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियंका चव्हाण हिची निवड झाली होती तिचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.

भिगवन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव वाळुंज म्हणाले की विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारचा अहंकार सोडून, सर्वांच्या सहभागाने आपले सामाजिक कार्य उंचवावे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की मन मे है विश्वास पूरा है विश्वास हम होंगे कामयाब या प्रमाणे आपण आपले सर्व सामाजिक कार्य पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत राहू .

बावडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू वावरे म्हणाले की,’ शिबिर कालावधीतील सकारात्मक गोष्टी घेऊन आपल्या जीवनात याचा उपयोग करावा.

बावडा महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे म्हणाले की,’ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती करिता ही शिबिरे त्यांना मार्गदर्शक ठरतील.’

यावेळी शिबिर अहवालाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रा. नामदेव पवार प्रा. प्रकाश करे, मयूर मखरे यांनी अहवालाचे लेखन केले. निकिता जाधव , इम्रान काझी , श्रीलेश विंचू या विद्यार्थ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कला शाखा विभाग प्रमुख डॉ. भिमाजी भोर, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिगवन महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. अनिल बनसोडे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिर कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या विविध उपक्रमाविषयीची माहिती कनिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सुवर्णा जाधव यांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंदापूर महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.पुरुषोत्तम साठे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार बावडा महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. तयाजी लोंढे यांनी आभार मानले. रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. उत्तम माने , प्रा. मनीषा गायकवाड, प्रा. धन्यकुमार माने, प्रा. सागर गुजराथी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केला.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??