ताज्या घडामोडी

रोइंग या क्रीडा प्रकारासाठी निवड होणारे राज्यातील एकमेव विद्यापीठ..

एमआयटी-एडीटीला 'खेलो इंडिया'साठी 'साई'ची मान्यता..

पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाला रोइंग या क्रीडा प्रकारासाठी प्रतिभावान खेळाडूंचा (मुले व मुली) शोध घेणे व त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) कडून खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र (निवासी) म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. अशाप्रकारे, क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित ‘साई’ची मान्यता मिळणारे एमआयटी एडीटी विद्यापीठ हे राज्यातील पहिलेच विद्यापीठ ठरले आहे.

एमआयटी एडीटी विद्यापीठातील क्रीडा संकुल हे जागतिक सोईसुविधांनी सुसज्ज आहे. विद्यापीठातील डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी स्पोर्ट्स अकादमीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांकडून रोइंग, बॉक्सिंग व जलतरण या खेळांसाठी अकादमीची स्थापना करत खेळाडूंना प्रशिक्षणाचे काम केले जाते. त्याच्या परिणामतः रोइंग अकादमीतील खेळाडूंनी आजवर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करताना पदक जिंकूण विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. गतवर्षी विद्यापीठातील स्कूल ऑफ लाॅ’चे प्रा.आदित्य केंदारींनी आशियाई इनडोअर रोइंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक पटकाविले होते.

या कामगिरीनंतर विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड म्हणाले, विद्यापीठाच्या रोइंग अकादमीला आता खेलो इंडियासाठी साईची मान्यता मिळाल्याने या क्रीडा प्रकारात रुची असणाऱ्या पुणे व परिसरातील खेळाडूंना या खेळाच्या प्रशिक्षणासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध होणार आहे.

या यशानंतर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक प्रा.पद्माकर फड यांनी क्रीडा विभागाचे अभिनंदन केले आहे.

                          राज्य सरकारच्या लक्षवेधी ही निवड

‘साई’सह महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या लक्ष्य वेध योजनेतही रोइंग क्रीडा प्रतिभा विकास प्रकाराचे प्रशिक्षण केंद्र म्हणून डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी स्पोर्ट्स अकादमीची निवड झाली आहे. तसेच, रोइंग खेळाडू म्हणून भाग्यश्री घुले, अनुष्का गर्जे आणि प्रशिक्षक म्हणून सुहास कांबळे यांना मान्यता मिळाली आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??