जिल्हाराजकीयसामाजिक

कदमवाकवस्तीचे लोकनियुक्त सरपंच चित्तरंजन गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य महोत्सवाचे भव्य आयोजन…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : लोकनियुक्त कदमवाकवस्ती सरपंच चित्तरंजन नाना गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कदमवाकवस्ती येथे एक वेगळा आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत भव्य आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप आणि रक्तदान शिबीर तसेच ब्लड कॅन्सर डोनर नोंदणी कॅम्प या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे, सुरक्षेच्या दृष्टीने मोफत हेल्मेट वाटप करून वाहतूक सुरक्षिततेचा संदेशही देण्यात आला.

हा उपक्रम संभाजी नगर ओपन स्पेस, महालक्ष्मी मंदिर, ज्ञानदीप शाळेसमोर येथे दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पार पडला.

सामाजिक बांधिलकीचे दर्शन…

या आरोग्य शिबिराद्वारे सरपंच चित्तरंजन नाना गायकवाड यांनी जनतेच्या आरोग्य व सुरक्षेच्या प्रश्नाला प्राधान्य दिले. “वाढदिवसाचा खर्च दिखाव्यासाठी नव्हे, तर समाजासाठी!” — या विचारातून या आरोग्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले, असे उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गार काढले. कार्यक्रमानंतर रक्तदाते व वैद्यकीय सेवकांचा विशेष सन्मान करण्यात आला.

🩸 भव्य रक्तदान शिबीर
👁️ मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर
👓 मोफत चष्मे वाटप
🩺 सर्वसाधारण मोफत आरोग्य तपासणी शिबीर
🧬 ब्लड कॅन्सर डोनर नोंदणी कॅम्प
🪖 मोफत हेल्मेट वाटप

शिबिरात नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला असून, डॉक्टर व वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकांनी दिवसभर सेवा दिली.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती…

या भव्य आरोग्य महोत्सवात विविध राजकीय, सामाजिक व सहकारी क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

त्यामध्ये प्रदीप कंद (अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा), प्रशांत काळभोर (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे), महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर, सुभाष जगताप (चेअरमन, यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर), अनिल टिळेकर (माजी सभापती, पंचायत समिती हवेली), हेमलता बडेकर (मा. उपसभापती, पंचायत समिती हवेली), सनी काळभोर (मा. उपसभापती, पंचायत समिती हवेली), राहुल काळभोर (सरपंच, लोणी काळभोर), सचिन तुपे (माजी सरपंच, कुंजीरवाडी), सुदर्शन चौधरी (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे), पुनम चौधरी (अध्यक्ष, भाजप महिला आघाडी पुणे जिल्हा), मोरेश्वर काळे (संचालक, यशवंत साखर कारखाना थेऊर), संजय भालेराव माजी चेअरमन लोणी काळभोर वि का वि,‌ युवा उद्योजक आबासाहेब काळे, गौरी गायकवाड (माजी सरपंच, कदमवाकवस्ती), अभिजीत बडदे (अध्यक्ष, तंटामुक्ती समिती कदमवाकवस्ती), गणेश चौधरी (अध्यक्ष, हवेली तालुका भाजप), कमलेश काळभोर (नेते, भाजप), योगेश काळभोर (माजी सरपंच, लोणी काळभोर), भरत काळभोर (माजी सरपंच, लोणी काळभोर), युवा उद्योजक पृथ्वीराज काकडे, हेमंत गायकवाड (अध्यक्ष, अंबरनाथ देवस्थान ट्रस्ट लोणी काळभोर), बापूसाहेब बोरकर (संचालक, साधना सहकारी बँक), युवराज काळभोर (नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) आणि संजय आबा काळभोर (चेअरमन, जनता विविध कार्यकारी सोसायटी) यांची उपस्थिती लाभली.

तसेच कदमवाकवस्ती ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, आजी-माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी असे सामाजिक कार्यकर्ते दीपक काळभोर यांनी सांगितले

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??