क्राईम न्युजसामाजिक

सावकारीचा हैदोस! पावणेसात लाखांच्या बदल्यात १२.२० लाख उकळले; पत्नीचा विनयभंग, जीवे मारण्याची धमकी – लोणी काळभोरमध्ये गुन्हा दाखल…

तुळशीराम घुसाळकर

लोणी काळभोर (ता. हवेली) : पावणेसात लाख रुपयांचे कर्ज देऊन तब्बल १० ते ७० टक्के दराने अवाजवी व्याज आकारत ऑनलाईन व रोख स्वरुपात १२ लाख २० हजार रुपये उकळूनही आणखी रकमेची मागणी करणाऱ्या सावकार व त्याच्या साथीदारांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी दत्तात्रय आनंदा पवार (वय ४३, रा. राहींजवस्ती, लोणी काळभोर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावकार शाम वामन सावंत व त्याच्या २ ते ४ साथीदारांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा प्रकार सन २०१९ ते २०२५ या कालावधीत लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील राहींजवस्ती परिसरात घडल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आर्थिक अडचणीमुळे ६ लाख ५९ हजार ३७५ रुपये कर्ज घेतले होते. मात्र सावकाराने १० ते ७० टक्क्यांपर्यंत अवाजवी व्याज आकारत फिर्यादी व त्यांच्या पत्नीकडून ऑनलाईन व रोख स्वरूपात एकूण १२ लाख २० हजार रुपये वसूल केले.

इतके पैसे घेतल्यानंतरही सावकार शाम सावंत याने आणखी ४ लाख रुपये मुद्दल बाकी असल्याचे सांगत फिर्यादीच्या पत्नीच्या मैत्रीणीची राहींजवस्ती येथील गट नंबर ४७ मधील १ गुंठा जमीन साठेखत करून घेतली. या साठेखतामध्ये ५ लाख रुपये दिल्याचे खोटे नमूद करण्यात आले असून, आता त्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे.

ताबा नको असल्यास साडेचार लाख रुपयांची खंडणी मागितली जात असून, रक्कम देणे अशक्य झाल्याने सावकाराने फिर्यादीच्या पत्नीला “तु आणि तुझी मुलगी धंद्यावर बस, धंदा करून पैसे फेड” असे अश्लील व अपमानास्पद शब्दांत बोलून तिचा विनयभंग केला. तसेच फिर्यादीला “पोलीसांत तक्रार केलीस तर तुला जीपला बांधून लोणी गावात वरात काढतो” अशी जीवघेणी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या सततच्या छळाला कंटाळून अखेर पवार यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून, सावकार व त्याच्या साथीदारांविरोधात अवैध सावकारी, आर्थिक फसवणूक, विनयभंग व धमकी या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??