क्राईम न्युजजिल्हा

घरफोडी करणारा एकजण जेरबंद ; गुन्हे शाखा युनिट-६ ची उत्कृष्ट कामगिरी…

पुणे : गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचत घरफोडी करणारा एक सराईत आरोपी जेरबंद केला आहे. या कारवाईत पोलिसांनी रु. १.८० लाखांचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला असून, या गुन्ह्यात आणखी दोन सोनारांचाही सहभाग उघड झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ०८ ऑक्टोबर २०२५ रोजी युनिट ६ चे सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, सारंग दळे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार आणि ऋषीकेश व्यवहारे हे गुन्हे प्रतिबंधक गस्तीस होते. त्यावेळी ऋषीकेश ताकवणेसचिन पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की, सुफियान मोहम्मद सिद्दीकी अन्सारी (वय २१, रा. भवानी पेठ, पुणे) हा खडक पोलीस स्टेशन गुन्हा क्र. १८९/२०२५, भा.दं.वि. कलम ३०५ अन्वये दाखल प्रकरणातील सोन्याचे बिस्कीट विक्रीसाठी हडपसर येथील भाजी मंडई परिसरात येणार आहे.

यानुसार पथकाने सापळा रचून अन्सारी याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे १० ग्रॅम व ५ ग्रॅम वजनाची दोन सोन्याची बिस्कीटे, किंमत रु. १,८०,०००/- असा मुद्देमाल सापडला. चौकशीदरम्यान त्याने ६५ ग्रॅम सोन्याचे दागिने विक्रीसाठी जितेंद्र किरणराज ओसवाल (वय ४०, काळेवाडी, पिंपरी) आणि संजय हरेंद्रनाथ मंडल (वय ४६, एम.जी. नगर, पिंपरी) या दोघा सोनारांना दिल्याचे कबूल केले.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या दोघांनाही ताब्यात घेतले असता, त्यांचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाला. सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील तपासासाठी खडक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, सारंग दळे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे आणि सुहास तांबेकर यांच्या पथकाने केली.

गुन्हे शाखा युनिट ६ च्या या धाडसी व वेगवान कारवाईमुळे घरफोडी गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??