राजकीय

एका जत्रेने देव म्हातारा होत नाही, वसंत मोरे यांचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना टोला…

पुणे (हडपसर) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हणून आम्ही चांगले जागे आहोत आणि कोणाची झोप कधी उडवायची आम्हाला चांगले समजते. एका जत्रेने देव म्हातारा होत नाही, अशा शब्दांत शिवसेना संघटक वसंत मोरे यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना टोला लगावला आहे.

         राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईमध्ये नुकतीच बैठक झाली. या बैठकीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांवर टीका केली होती. विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही. तर शिवसेना ठाकरे गट अद्याप झोपेतून जागा झालेला नाही, असे विधान डॉ. अमोल कोल्हे यांनी पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले होते.

 

ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08

          अमोल कोल्हे यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेचे संघटक वसंत मोरे यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत चांगलाच समाचार घेतला आहे. “मा. खासदार साहेब जर निवडणुका झाल्यानंतर म्हणत असतील की शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आजुन झोपेतून जागा झाला नाही तर साहेब एक गोष्ट लक्षात ठेवावी आम्ही शिवसेना म्हणून चांगले जागे आहोत आणि कोणाची झोप कधी उडवायची आम्हाला चांगले समजते…एका जत्रेने देव म्हातारा होत नाही…” असे वसंत मोरे म्हणाले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??