क्राईम न्युज

सहा महिन्यांचा लपंडाव संपला ; मोका गुन्ह्यातील आरोपी गणेश आष्टुळला वानवडी पोलिसांची शिताफीची सापळा कारवाई…

वानवडी (हडपसर) : हडपसर परिसरातील काकासाहेब शिरोळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करून सहा महिन्यांपासून पोलीसांना गुंगारा देत फरार राहणाऱ्या मोका गुन्ह्यातील पाहिजे आरोपी गणेश दीपक आष्टुळ (वय २१, रा. शिंदेवस्ती, एसआरए सोसायटी, हडपसर) याला वानवडी पोलिसांनी शेवटी पर्वती परिसरातून शिताफीने सापळा रचून अटक करण्यात यश मिळवले आहे. दि. ४ जुलै २०२५ रोजी रात्री सुमारे ८.१५ वाजता शिंदेवस्तीतील एसआरए बिल्डिंग परिसरात फिर्यादी काकासाहेब शिरोळे हे रिक्षामध्ये गाणी ऐकत नातेवाईकांची वाट बघत बसलेले असताना आरोपी गणेश आष्टुळ व त्याच्या साथीदारांनी रिक्षातील साऊंड बंद करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी नकार दिल्याने आरोपींनी लोखंडी कोयते, लाकडी दांडके इत्यादी शस्त्रांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २७३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ मधील १०९, ११८(२), १८९(२), १९१(१)(२)(३), १९०, ३५१(२)(३), तसेच आर्म्स अ‍ॅक्ट ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१)(३) सह १३५ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोका कायद्याच्या कलम ३(१)(ii), ३(२), ३(४) अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. इतर आरोपी आधीच ताब्यात असून मुख्य आरोपी गणेश आष्टुळ मात्र घटनेनंतर पळ काढून सतत ठिकाणे बदलत पोलिसांना चकवण्यात यशस्वी ठरत होता.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तपास पथक सतत त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. याच दरम्यान पोलीस अंमलदार विष्णू सुतारविठ्ठल चोरमले यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी गणेश आष्टुळ पर्वतीमधील जनता वसाहत, शंकर मंदिराजवळ आपले अस्तित्व लपवून वावरत आहे. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून वरिष्ठांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोउनि अल्फाज शेख आणि पथकाने तत्काळ त्या भागात धडक दिली. परिसरात शोधमोहीम सुरू असताना आरोपी दिसताच पोलिसांनी कोणतीही गडबड न होऊ देता अत्यंत शिताफीने त्याला सापळ्यात अडकवून ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्हा केल्याची कबुलीही दिली असून तपासात त्याचा सहभाग स्पष्टपणे सिद्ध झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.

गणेश आष्टुळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२४, ५०९, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४४, १४७, १४८, १४९ अंतर्गत गुन्हा रजि. नं. १६४४/२०२३ दाखल आहे. त्यामुळे त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती आणि स्थानिक परिसरातील दहशत लक्षात घेता पोलिसांनी त्याच्या अटकेला विशेष महत्त्व दिले.

ही कारवाई परिमंडळ ५ च्या पोलीस उप-आयुक्त श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयकुमार डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोउनि अल्फाज शेख आणि पोलीस अंमलदार अतुल गायकवाड, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, विष्णू सुतार, विठ्ठल चोरमले, बालाजी वाघमारे, आशिष कांबळे, अभिजित चव्हाण, गोपाळ मदने, अमोल गायकवाड आणि अर्शद सय्यद यांच्या पथकाने केली. वानवडी पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??