जिल्हामहाराष्ट्रशिक्षणसामाजिक

प्रलंबित शिक्षकभरती तात्काळ सुरू करण्यासाठी आज मुंबईत धरणे आंदोलन…

मुंबई : महाराष्ट्रातील प्रलंबित शिक्षकभरती तात्काळ सुरू करावी तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत या मागणीसाठी शिवयुनिटी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज (दि. १० मार्च २०२६) मुंबई येथील आझाद मैदानावर पवित्र पोर्टल शिक्षकभरतीसंदर्भात धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी १० वाजता होणाऱ्या या आंदोलनात राज्यभरातील शिक्षक व शिक्षक पात्र उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

राज्यात अनेक वर्षांपासून शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकभरती प्रक्रिया सुरू असली तरी ती अत्यंत संथ गतीने होत असल्याने पात्र उमेदवारांमध्ये नाराजी वाढत असल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया वेगाने राबवून सर्व रिक्त पदे तात्काळ भरावीत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

या आंदोलनातून RTE (मूलभूत शिक्षणाचा अधिकार कायदा) नुसार ९० टक्के शिक्षक पदभरती करावी, पवित्र पोर्टलमधील पसंदीक्रमाची अट रद्द करावी, तसेच राज्यातील सर्व विभागांतील रिक्त शिक्षक पदे तातडीने भरावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांना देखील पवित्र पोर्टलद्वारेच भरती करणे बंधनकारक करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

तसेच कला, क्रीडा आणि आयटी विषयांसाठी स्वतंत्र शिक्षक भरती सुरू करावी, कोकण विभागात राबविण्यात आलेला ‘कोकण पॅटर्न’ संपूर्ण राज्यभर लागू करावा आणि शिक्षण सेवकांचे मानधन वाढवावे, अशा विविध मागण्याही आंदोलनातून करण्यात येणार आहेत. शिक्षण क्षेत्रातील रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचा दावा करत राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील शिवयुनिटी फाउंडेशनच्या वतीने देण्यात आला आहे.

दरम्यान, या आंदोलनासाठी राज्यभरातील शिक्षक व शिक्षक पात्र उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा, असे आवाहन शिवयुनिटी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??