क्राईम न्युज

माजी उपसरपंचाचा खून, मृतदेहाचे तुकडे खडकवासल्यात फेकले, दोन महिन्यांनी समोर आलं हत्येचं कारण…

पुणे (खडकवासला) : पुण्यातील सिंहगड पायथा फिरायला गेलेले शासकीय ठेकेदार आणि डोणजे गावचे माजी उपसरपंच विठ्ठल पोळेकर यांची नोव्हेंबर महिन्यात हत्या करण्यात आली होती. विठ्ठल पोळेकर यांचं अपहरण केल्यानंतर तासाभरात आरोपींनी त्यांचा खून केला, यानंतर आरोपींनी मृतदेहाचे तुकडे करून खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात टाकून दिले होते.

पोळेकर हत्या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली होती, पण मुख्य सूत्रधाराला पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे.

१९ नोव्हेंबर २०२४ ला सिंहगड पायथ्याजवळील डोणजे गावात विठ्ठल सखाराम पोळेकर फिरायला गेले होते. बराच वेळ विठ्ठल पोळेकर घरी न परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोळेकर यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालं, पण या हत्येचं कारण आता समोर आलं आहे.

                हत्येचं कारण समोर आले.

या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी योगेश भामे याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. शासकीय ठेकेदार पोळेकर यांनी पायगुडेवाडी ते गोळेवाडी रस्त्याच्या कामाचा ठेका घेतला होता. या कामात अडथळा आणण्याची धमकी देऊन मुख्य आरोपी योगेश भामने याने पोळेकर यांच्याकडे महागडी मोटार आणि दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. पोळेकर यांनी खंडणी आणि महागडी मोटार द्यायला नकार दिल्याने ही हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://vedhjanshakticha.in/ वेध जनशक्तीचा (Vedh Janshakticha) – सूचना व अस्वीकरण... "वेध जनशक्तीचा" हे वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हा यामागील मुख्य आणि प्रामाणिक उद्देश आहे. या माध्यमाचा उपयोग कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटकाची बदनामी, अवहेलना अथवा मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास देण्यासाठी केला जात नाही. आमच्या प्रतिनिधी, वार्ताहर आणि विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेली माहिती प्रसारित करणे हा आमचा निखळ व प्रामाणिक हेतू आहे. प्रसारित केलेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरासंदर्भात कोणताही वाद, तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्यावरील न्यायक्षेत्र (Jurisdiction) बारामती, ता. बारामती, जि. पुणे येथे राहील. मुख्य संपादक : श्री. सुनिल थोरात संपर्क : 7249314996 संपादक : श्री धनंजय काळे संपर्क : 9665221813 कायदेशीर सल्लागार : श्री. आनंद थोरात टीप : सर्व वार्ताहर, प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींनी आवश्यक बाबींसाठी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ⚠️ महत्त्वाची नोंद "वेध जनशक्तीचा" हे पोर्टल सत्य, अचूक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही खोटी, दिशाभूल करणारी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तथापि, अनावधानाने एखाद्या बातमीत किंवा पोस्टमध्ये चुकीची माहिती प्रकाशित झाल्यास संबंधित व्यक्तींनी त्या बातमीची लिंक, आवश्यक पुरावे व सविस्तर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. प्राप्त माहितीनुसार वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित मजकूर तात्काळ दुरुस्त अथवा हटविण्यात येईल. 🙏🏻आपल्या सूचना, अभिप्राय आणि सहकार्याचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??